प्रार्थना बेहरे या चित्रपटाचं करतेय डबिंग, व्हिडीओ केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 14:54 IST2021-01-29T14:51:55+5:302021-01-29T14:54:55+5:30
प्रार्थनाने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना ती डबिंग करत असल्याचे सांगितले आहे.

प्रार्थना बेहरे या चित्रपटाचं करतेय डबिंग, व्हिडीओ केला शेअर
प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते. नुकतेच प्रार्थनाने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना ती डबिंग करत असल्याचे सांगितले आहे.
अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले की, चित्रपट बनण्याच्या प्रक्रियेतील माझे सर्वात आवडते काम. डबिंग. कलाकारांचे जीवन. माझा आगामी सिनेमा छुमंतर.
प्रार्थना बेहरेने काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये छूमंतर चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. या चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. तिथे शूटिंग करतानाचे फोटो आणि व्हिडीओ कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर छूमंतर शिवाय प्रार्थना एका हिंदी बेवसीरिजमध्ये देखील दिसणार आहे.प्रार्थनाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली.
याआधी तिने 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली.कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमात काम केलं आहे.