तेजश्री-शर्मनच्या नाटकचे पोस्टर आउट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 15:34 IST2016-05-06T10:04:56+5:302016-05-06T15:34:56+5:30
होणार सून मी या घरची या मालिकेतून महाराष्ट्राची लाडकी सून जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान ही बॉलीवुडचा तगडा कलाकार शर्मन ...
.jpg)
तेजश्री-शर्मनच्या नाटकचे पोस्टर आउट
ह णार सून मी या घरची या मालिकेतून महाराष्ट्राची लाडकी सून जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान ही बॉलीवुडचा तगडा कलाकार शर्मन जोशी यासोबत हिंदी नाटकमध्ये झळकणार आहे ही गोष्ट सर्वानाच माहिती आहे. त्यामुळे साहजिकच या सुंदर अभिनेत्यासोबतची झलक पाहण्यासाठी लागलेली चाहत्यांची उत्सुकता आता संपलेली आहे. कारण नुकतेच शर्मन जोशी व तेजश्री प्रधान यांच्या मै और तुम या नाटकचे पोस्टर आउट झाले आहे. विशेष, म्हणजे या नाटकाची निर्माती आणि दिग्दर्शन शर्मन जोशी याने स्वत: केली आहे. हे नाटक १९७५ साली आलेलं सेम टाईम नेक्स्ट ईयर ह्या इंग्रजी नाटकावर आधारीत आहे. आता, बॉलिवूडचा शर्मन जोशी आणि मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधानची नाटकात रोमॅण्टीक केमिस्ट्री कशी जुळेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. तसेच तेजश्री हिंदी नाटकसह बॉलीवुडमध्येदेखील पदापर्ण करत असल्याने तिचे चाहत्यांचा आनंद व्दिगुणीत झाला असेल हे नक्की.