'बेभान' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2017 13:27 IST2017-01-03T13:27:33+5:302017-01-03T13:27:33+5:30

 अनुप जगदाळे दिग्दर्शित बेभान या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशलमीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरला सोसलमीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळताना ...

Poster display of 'Bhaban' movie | 'बेभान' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

'बेभान' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

 
नुप जगदाळे दिग्दर्शित बेभान या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशलमीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरला सोसलमीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या पोस्टरवर ठाकूर अनुपसिंगचा रांगडा तसेच प्रेमात बेभान झालेला प्रियकर प्रेक्षकांना  दिसून येतोय. प्रेमाचा रंग लाल असल्याने हे पोस्टरदेखील लाल रंगाच्या बॅकग्रॉउंडवर बनवण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि ठाकूर अनुपसिंग मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ठाकूर अनुपसिंग याने यापूर्वी अनेक  दाक्षिणात्य चित्रपट केले आहेत. तो या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदापर्ण करत आहे. यापूर्वी ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी बॉलिवुड आणि मराठी चित्रपटसृष्टीत पदापर्ण केले आहे. आता यांच्या पाठोपाठ ठाकूर अनूपसिंग या अभिनेत्यालाही मराठी चित्रपटांचा मोह आवरता आला नाही. तो या चित्रपटात दमदार पदार्पण करताना दिसणार आहे. वयाच्या २२ वर्षांपासून ठाकूर अनुपसिंगने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात छोट्या पडद्यापासून केली. बेभान या चित्रपटातून ठाकूर अनुपसिंगचा राऊडी लुक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ए.वि प्रफुल्लचंद्र यांनी या चित्रपटासाठी सुमधूर संगीत दिले असून मंगेश कांगणे यांनी गीते लिहिली आहेत. अनूप-अनूप अशा जोडगोळीचा रोमान्स विथ अ‍ॅक्शन या चित्रपटात प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. मधुकर (अण्णा ) उद्धव देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रसाद देशपांडे हे सहनिमार्ते आहेत. दिनेश देशपांडे लिखित आणि शांभवी फिल्म्स निर्मित हा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच सिंघम -3 या तेलगू तर कमांडो २ या हिंदी अशा आगामी चित्रपटांमध्ये ठाकुर अनूपसिंग झळकणार आहे  


Web Title: Poster display of 'Bhaban' movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.