नवरात्रोत्सवानिमित्त पूजा सावंतनं शेअर केला १३ वर्ष जुना व्हिडीओ, म्हणाली....
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 11:36 IST2025-09-26T11:36:26+5:302025-09-26T11:36:59+5:30
पूजा सावंतने नवरात्रोत्सवानिमित्त खास व्हिडीओ शेअर केला आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त पूजा सावंतनं शेअर केला १३ वर्ष जुना व्हिडीओ, म्हणाली....
Navratri: 'मिस कलरफूल' म्हणून ओळखली जाणारी मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत (Pooja Sawant). मराठीसह बॉलिवूडमध्येही दमदार अभिनय करुन तिनं लोकप्रियता मिळवली आहे. पूजा सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर नवरात्रीनिमित्त खास व्हिडीओ शेअर केला आहे. जो सध्या चर्चेत आला आहे.
पूजाने इन्स्टाग्रामवर १३ वर्ष जुना व्हिडीओ शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. हा व्हिडीओ 'आईचा जोगवा मागेन' या गाण्यावरील तिच्या सुंदर नृत्याचा आहे. या सादरीकरणामध्ये देवीच्या रुपातील पूजाचे भावपूर्ण हावभाव विशेष लक्ष वेधून घेत आहेत. या नृत्यासाठी पूजाने हिरवी साडी, हिरव्या बांगड्या, कपाळावर कुंकू आणि हळदीचा टिळा, नाकात नथ आणि मोकळे केस असा पारंपरिक लूक केला होता.
हा व्हिडीओ शेअर पूजाने लिहलं, "१३ वर्षांपूर्वी महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात जोगवा करण्याची संधी मिळाली होती. त्यासाठी केदार सरांचे आभार मानावे तितके कमीच आहेत. अशी संधी भाग्यानेच मिळते. चारुशीला ताईने ह्याचं नृत्यदिग्दर्शन केलं होतं. ते जादूमय दिवस होते", असं तिनं म्हटलं.
पूजाने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांनी तिचे खूप कौतुक केले आहे. आता आगामी काळात अभिनेत्री कोणत्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याबद्दल उत्सुकता कायम आहे. पूजाने २०१० साली 'क्षणभर विश्रांती' या चित्रपटातून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यात 'झकास', 'सतरंगी रे', 'दगडी चाळ', 'लपाछपी' आणि 'नीलकंठ मास्तर' यांचा समावेश आहे.