"जो शाळेत माझ्याशी एक शब्दही बोलला नाही त्याने मला", अभिनेत्रीने संस्कृती बालगुडेने सांगितला ‘तो’ किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 04:01 PM2023-06-03T16:01:36+5:302023-06-03T16:35:49+5:30

लोकमत फिल्मीशी बोलताना संस्कृतीने तिचा हा किस्सा सांगितला आहे.

Pinjara fame sanskrit balgude share her collage days story | "जो शाळेत माझ्याशी एक शब्दही बोलला नाही त्याने मला", अभिनेत्रीने संस्कृती बालगुडेने सांगितला ‘तो’ किस्सा

"जो शाळेत माझ्याशी एक शब्दही बोलला नाही त्याने मला", अभिनेत्रीने संस्कृती बालगुडेने सांगितला ‘तो’ किस्सा

googlenewsNext

कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचं कसब अभिनेत्री संस्कृती बालगुडेकडे आहे. तिने आजवर बऱ्याच अवघड भूमिकाही अगदी सोप्या पद्धतीने सादर करीत रसिकांची मनं जिंकली आहेत. अनेक सिनेमे न स्वीकारता सिलेक्टिव्ह राहायला संस्कृतीला आवडते. अभिनेत्री संस्कृती बालगुडेही सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. संस्कृती आपल्या पर्सनल आणि प्रोफेशन लाईफबाबतची सगळी माहिती चाहत्यांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून देत असते.
 
नुकतेच लोकमत फिल्मीशी बोलताना संस्कृतीने काही विचित्र प्रश्नांची धमाल उत्तर दिली. यावेळी अभिनेत्रीला पहिलं प्रपोज कधी केलं होतासं असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर संस्कृती म्हणाली, मी आयुष्यात कधी कुणाला प्रपोज नाही केलं. यानंतर तिला तुला तुझं पहिलं प्रपोज कुणी केलं हे आठवतंय का हा प्रश्न विचारण्यात आला यावर तिने हो, 
 असं उत्तर दिले. 

 

संस्कृती म्हणाली, शाळेत एक मुलगा होता, जो शाळेत माझ्याशी कधी एक शब्द ही नाही बोलला. कॉलेजमध्ये असताना आमची मैत्री झाली. त्यानंतर त्याने मला सांगितलं होतं माझ्याबद्दल त्याला फिलिंग्स आहेत. मला असं झालं होत कधी केव्हा. कारण शाळेत असताना माझ्याकडे कुणी बघायचे नाही, मला भावा द्यायचे नाही. त्यामुळे माझ्यासाठी हे शॉकिंग होतं.    

दरम्यान संस्कृतीने पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली. ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत. तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती. यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. २ जूनला तिचा चौक सिनेमा रिलीज झाला आहे. 
 

Web Title: Pinjara fame sanskrit balgude share her collage days story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.