​जळू या चित्रपटाच्या गीतांची कोरिओग्राफी करणार फुलवा खामकर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2017 01:55 PM2017-03-24T13:55:36+5:302017-03-24T19:25:36+5:30

फुलवा खामकरने फोटोग्राफी, पोस्टर गर्ल, क्लासमेट, प्रियत्तमा, मितवा, नटरंग यांसारख्या अनेक चित्रपटांमधील गीतांची कोरिओग्राफी केली आहे. आज मराठीतील एक ...

Phulwa Khamkar will choreographed the songs of the film Jull | ​जळू या चित्रपटाच्या गीतांची कोरिओग्राफी करणार फुलवा खामकर

​जळू या चित्रपटाच्या गीतांची कोरिओग्राफी करणार फुलवा खामकर

googlenewsNext
लवा खामकरने फोटोग्राफी, पोस्टर गर्ल, क्लासमेट, प्रियत्तमा, मितवा, नटरंग यांसारख्या अनेक चित्रपटांमधील गीतांची कोरिओग्राफी केली आहे. आज मराठीतील एक प्रसिद्ध कोरिओग्राफर म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. नटरंग या चित्रपटातील अप्सरा आली आणि वाजले की बारा या गाण्यांना तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या गाण्यांच्या यशामागे फुलवाचादेखील तेवढाच हात होता. आता फुलवा एका नवीन चित्रपटाची कोरिओग्राफी करत आहे.
सीआयडी, आहट, कॉमेडी एक्सप्रेस यांसारख्या प्रसिद्ध कार्यक्रमाचे संकलन निखिल भोसले यांनी केले होते. संकलन क्षेत्रातील एक मोठे नाव म्हणून निखिल भोसलेंना मानले जाते. ते आता दिग्दर्शनाकडे वळले आहेत. जळू हा चित्रपट प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन ते करत आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणास लवकरच सुरुवात होणार आहे. या चित्रपटात कोण कोणते कलाकार असणार आहे हे अद्याप गुलदस्त्यातच ठेवणे चित्रपटाच्या टिमने पसंत केले आहे. पण या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार असणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाच्या कथेप्रमाणे गीतांनादेखील तितकेच महत्त्व असणार आहे. या चित्रपटातील गाण्यांची कोरिओग्राफी फुलवा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या चित्रपटाची निर्मिती अजितकुमार धुळे करत असून सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारा हा चित्रपट असणार आहे. 
जळू या चित्रपटाद्वारे समाजातील महिलांचे प्रश्न मांडले जाणार आहेत. महिला सशक्तीकरण ही काळाची गरज आहे असे मानणारा हा चित्रपट आहे. चित्रपटासाठी काही कलाकारांची निवड झाली असून सध्या काही भूमिकांसाठी कलाकारांची शोधाशोध सुरू असल्याची चर्चा आहे.  

Web Title: Phulwa Khamkar will choreographed the songs of the film Jull

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.