फोटोकॉपी चित्रपट १६ सप्टेंबरला प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 14:42 IST2016-08-05T09:09:46+5:302016-08-05T14:42:05+5:30
व्हायकॉम इंटरनॅशनल आणि नेहा राजपाल यांची निर्मिती असलेल्या फोटोकॉपी या चित्रपटाचे नुकतेच पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटात जुळ्या ...

फोटोकॉपी चित्रपट १६ सप्टेंबरला प्रदर्शित
्हायकॉम इंटरनॅशनल आणि नेहा राजपाल यांची निर्मिती असलेल्या फोटोकॉपी या चित्रपटाचे नुकतेच पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटात जुळ्या बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटातील पर्णच्या दोन्ही व्यक्तिरेखांसाठी असलेला लुक पोस्टरवरून दिसून येतआहे. तसेच, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुझं माझं सेम असतं अशी टॅगलाइनही पोस्टरवर दिसत आहे. या चित्रपटाची कथा ओमकार मंगेश दत्त आणि डॉ. आकाश राजपाल यांनी लिहिली असून विजय मौर्य यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाची पटकथा तसेच संवाद विजय मौर्य आणि योगेश जोशी या दोघांनी मिळून लिहिले आहेत. मनोरंजनाने भरलेला हा चित्रपट येत्या १६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
![]()