पावनखिंड'मध्ये बाजीप्रभू साकारणाऱ्या अजय पुरकर यांच्या लेकीला पाहिलंत का? दिसते फारच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 08:00 AM2022-06-18T08:00:00+5:302022-06-18T08:00:02+5:30

Pawankhind fame Marathi Actor Ajay Purkar : अजय पुरकर यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाहीच.  कधी नायक तर कधी खलनायक म्हणून तर कधी एक गायक म्हणून त्यांनी आपली कारकीर्द उभी केली आहे. पण सध्या त्यांची नाही तर त्यांच्या लेकीची चर्चा आहे....

pawankhind fame marathi actor ajay purkar daughter saee photo goes viral | पावनखिंड'मध्ये बाजीप्रभू साकारणाऱ्या अजय पुरकर यांच्या लेकीला पाहिलंत का? दिसते फारच सुंदर

पावनखिंड'मध्ये बाजीप्रभू साकारणाऱ्या अजय पुरकर यांच्या लेकीला पाहिलंत का? दिसते फारच सुंदर

googlenewsNext

Pawankhind fame Marathi Actor Ajay Purkar daughter Saee : ‘पावनखिंड’ (Pawankhind ) या चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातील प्रत्येक कलाकरांच्या अभिनयाचं कौतुक झालं. पण यापैकी एका कलाकारावर सर्वाधिक कौतुकाचा वर्षाव झाला. हा कलाकार कोण तर बाजीप्रभूंची भूमिका साकारणारे अजय पुरकर (Ajay Purkar). होय, बाजीप्रभूंची भूमिका ते अक्षरश: जगले. या भूमिकेसाठी त्यांनी दोन वर्ष अपार मेहनत घेतली आणि त्यांची ती मेहनत पडद्यावर दिसली. बाजीप्रभूंची व्यक्तिरेखा त्यांनी इतकी लिलया जिवंत केली की त्याला तोड नाही.

खरं तर अजय पुरकर यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाहीच.  कधी नायक तर कधी खलनायक म्हणून तर कधी एक गायक म्हणून त्यांनी आपली कारकीर्द उभी केली आहे. पण सध्या त्यांची नाही तर त्यांच्या लेकीची चर्चा आहे.

होय, अजय पुरकर यांचा त्यांच्या लेकीसोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. अजय यांनी लेक दिसायला फारच सुंदर आहे. बाप-लेकीचं बॉन्डिंग तर भारी आहे. अजय मुलीसोबतचे अनेक फोटो शेअर करत असतात. त्यांच्या मुलीचं नाव सई आहे. सई काय करते, याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाहीत. पण सध्या तिची चर्चा जोरात आहे.

अजय पुरकर यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी घर बांधलं आहे. ज्या भूमीत पावनखिंडीची लढाई झाली त्याच भूमीत आपलं घर असावं अशी त्यांची इच्छा होती आणि अखेर ते स्वप्न पूर्ण झालं आहे, त्यांच्या या घराचे फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

अजय यांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपट, मालिका व नाटकांत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या ‘कोड मंत्र’ या नाटकानं एकाच वर्षात तब्बल 24 पुरस्कार  मिळवले होते. अजय यांनी नाटकांसोबतच मालिका आणि चित्रपट क्षेत्रात देखील अभिनयाचा ठसा उमठवला आहे. बालगंधर्व, प्रेमाची गोष्ट, कदाचित, फेरारी की सवारी, रिस्पेक्ट, फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड अशा अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.

Web Title: pawankhind fame marathi actor ajay purkar daughter saee photo goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.