​ राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘परतु’ ला ३ नामांकने

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2016 18:47 IST2016-04-15T13:17:49+5:302016-04-15T18:47:49+5:30

५३ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांसाठीच्या नामांकनांमध्ये प्रथम चित्रपट निर्मिती पदार्पण पुरस्कारांच्या ३ नामांकनांमध्ये ‘परतु’ ची निवड झाली आहे. ...

'Pata'o 3 laureates in State Marathi Film Awards | ​ राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘परतु’ ला ३ नामांकने

​ राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘परतु’ ला ३ नामांकने

व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांसाठीच्या नामांकनांमध्ये प्रथम चित्रपट निर्मिती पदार्पण पुरस्कारांच्या ३ नामांकनांमध्ये ‘परतु’ ची निवड झाली आहे. अमेरिकेतील ‘इस्ट वेस्ट फिल्म’या कंपनीने येथील परतु मुव्ही एल एल पी च्या माध्यमातून ‘परतु’या सत्याकथेवरील आधारित चित्रपटाची निर्मिती केली आहे. डेरेल कॉक्सं, नितीन  अडसूळ, क्लार्क म्याकमिलियन, रुपेश महाजन आणि सचिन अडसूळ हे या चित्रपटाचे निमार्ते आहेत.
रक्ताच्या नात्यापेक्षा सहवासाच्या, अनुभूतीच्या नात्याचे बंध अधिक बळकट असतात. अशाचं जपलेल्या अनोख्या बंधाची व भावभावनांची हृदयस्पर्शी कथा म्हणजे ‘परतु’. चित्रपटाचे कथानक, कलावंत आपल्या मातीतले पण चित्रपटाची निर्मितीमूल्ये, नियोजन व्यवस्था आंतरराष्ट्रीय दजार्ची करण्यात आली आहेत. जीवनातील भावभावनांचा सुरेख संगम, हळुवार फुलत जाणारी प्रेमकथा दाखवतानाच प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा उत्कट भावभावनांच्या घुसमटींचा आविष्कार प्रत्येकालाच भावूक करणारा आहे. 
नगर जिल्ह्यात घडलेली ही सत्य घटना एका साध्या शेतकरी माणसाची आहे. एका घटनेने त्याचे आयुष्य कसे बदलते व राजस्थानच्या भूमीपर्यंत त्याचा प्रवास कसा होतो हे या कथेद्वारे सांगितले गेले आहे. या कथेची भाषा ही जरी मराठी असली तरी त्याचा आत्मा हा यूनिवर्सल आहे. ‘परतु’च्या उत्कृष्ट संगीतसाठी शशांक पोवार आणि उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून स्मिता तांबे यानाही नामांकने मिळाली आहेत


 

Web Title: 'Pata'o 3 laureates in State Marathi Film Awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.