​‘अशी ही आमची कॉलेज जर्नी’ चित्रपटाचा दिमाखदार म्युझिक लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 10:24 IST2018-01-16T04:54:44+5:302018-01-16T10:24:44+5:30

कॉलेज भावविश्वाचा हळवा कप्पा प्रत्येकाच्या मनाशी जपलेला असतो. आतापर्यंत कॉलेज भावविश्वावर आधारित अनेक मराठी सिनेमांनी सिनेप्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. ...

'This is our college Journey', the spectacular music launch of the film | ​‘अशी ही आमची कॉलेज जर्नी’ चित्रपटाचा दिमाखदार म्युझिक लाँच

​‘अशी ही आमची कॉलेज जर्नी’ चित्रपटाचा दिमाखदार म्युझिक लाँच

लेज भावविश्वाचा हळवा कप्पा प्रत्येकाच्या मनाशी जपलेला असतो. आतापर्यंत कॉलेज भावविश्वावर आधारित अनेक मराठी सिनेमांनी सिनेप्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. महाविद्यालयीन आयुष्यावर आधारित ‘अशी ही आमची कॉलेज जर्नी’ हा नवीन सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बालाजी फिल्म क्रिएशनची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाचा म्युझिक लाँच नुकताच अभिनेते विजय कदम, दिग्दर्शक दिपक कदम यांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाला. यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, तसेच सहकार्यवाहक विजय खोचीकर, ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश साळगावकर, उद्योगपती अविनाश तुपे, डॉ. राजेंद्र पडोळे आदी मान्यवर मंडळी आणि कलाकार तंत्रज्ञ उपस्थितीत होते. विशाल (आप्पा) कानकाटे या चित्रपटाचे निर्माते असून अभिजीत साठे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. २ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अशी ही आमची कॉलेज जर्नी’ हा सिनेमा प्रत्येकाला आपल्या कॉलेज विश्वात घेऊन जाईल असा विश्वास निर्माता दिग्दर्शकांनी याप्रसंगी व्यक्त केला. 
कॉलेज लाइफमध्ये धमाल मस्ती करणारी दोस्त मंडळी, एकमेकांशी असलेले नाते आयुष्यभर जपतात. त्यांच्या याच मैत्रीच्या नात्याचा वेध घेत प्रेमाचा हृदयस्पर्शी प्रवास हा चित्रपट उलगडतो. वेगवेगळ्या जॉंनरची चार गाणी या सिनेमात आहेत. गीतकार अभिजीत साठे, शुभम जाधव, गरुठा गुळीक यांच्या लेखणीने सजलेल्या या गाण्यांना साई-पियूष यांनी संगीतसाज चढवला आहे. अवधूत गुप्ते, रोहित राऊत, मालविका दीक्षित यांनी ही गाणी गायली आहेत. पार्श्वसंगीत अनुराग भारद्वाज यांचे आहे. अर्चना जावळेकर आणि अनिल सुतार यांनी नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी तर सहनृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी ललिता साठे, कोमल निळकंठ, प्रियंका जावळेकर, मयुरी जावळेकर यांनी सांभाळली आहे.
सुप्रिया पाठारे, हर्षद वाघमारे, मोहिनी अवसरे, शरदभाऊ जोरी, प्रदीप बनसोडे, सतीश बनसोडे, शुभम बनसोडे, सोमनाथ बोरगावे, मयुरी भालेराव, सुप्रिया बरकडे, आदेश चांदोडे, राजलक्ष्मी बसवंती या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. कथा-पटकथा-संवाद अभिजीत साठे यांनी लिहिले आहेत. सहनिर्माते केडी चौधरी तर कार्यकारी निर्माते विनोद बरई आहेत. 



Web Title: 'This is our college Journey', the spectacular music launch of the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.