सध्या अधुनिक जगात जगताना तरुण मुले जशी फॉरवर्ड विचार करताना दिसतात तशीच ती ...
लीव इन रिलेशनवर भाष्य करणार फक्त तुझ्याचसाठी
/> सध्या अधुनिक जगात जगताना तरुण मुले जशी फॉरवर्ड विचार करताना दिसतात तशीच ती आपले आयुष्य देखील आपल्या विचारांवरच जगताना पहायला मिळतात. लग्न न करता दोघांनी एकत्र राहणे हे जरी समाजाला पटत नसले तरी आजची तरुणाई त्याला दुजोरा देत नाही. लीव-इन रिलेशनशीप सारख्या विषयावर भाष्य करणारा फक्त तुझ्याचसाठी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात प्रामुख्याने मुले लीवइन मध्ये कशी राहतात अन मग त्यांना नंतर समाजाचा, कुटूंबाचा कशाप्रकारे सामना करावा लागतो या विषयावर प्रकाश टाकण्यात आला आहे. आदित्य एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये सीइओ असतो. त्याच्याच कंपलीमधील एका मुलीच्या तो प्रेमात पडतो अन ते दोेघे लग्न न करता एकत्र राहु लागतात. मग एके दिवशी आदित्य चे वडिल येतात त्यांना हा प्रकार सहन होत नाही अन ते आपल्या मुलाला घेऊन जातात व त्याचे लग्न लावतात. अशाप्रकारे कुटूंब त्यांच्या नात्याला स्वीकारत नाही अन मग पुढे नक्की काय होते ते आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल. हा वेगळा अन तरुणांना अपील होणारा विषय प्रेक्षकांना किती आवडतोय हे पाहणे मनोरंजक ठरेल.