सिद्धार्थ चांदेकरला सेटवर भेटायला आला हा मित्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 13:53 IST2018-09-25T13:51:49+5:302018-09-25T13:53:38+5:30
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरला चित्रीकरणाच्या सेटवर त्याला एक मित्र भेटायला आला होता.

सिद्धार्थ चांदेकरला सेटवर भेटायला आला हा मित्र
ठळक मुद्देसिद्धार्थला आवडतात प्राणी
मराठी चित्रपटसृष्टीत अल्पावधीतच आपले स्थान निर्माण करणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सध्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रीकरणाच्या सेटवर त्याला एक मित्र भेटायला आला होता. कोण मित्र आला असेल, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल ना... या मित्राबाबत सिद्धार्थ चांदेकरने इन्स्टाग्रामवर सांगितले. हा मित्र दुसरा तिसरा कुणी नसून तिथला पाळीव कुत्रा आहे.
सिद्धार्थ चांदेकर आपल्या या मित्रासोबत फोटो शेअर करून लिहिले की, सेट वर एक मित्र भेटायला आला. तो म्हणाला शूटिंग चालूच असतं तुझं, आधी डोकं खाजवून दे. बरं ठीके. #भुभु
सिद्धार्थ सध्या कोणत्या सिनेमाचे चित्रीकरण करतो आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. सिद्धार्थला प्राण्यांची आवड असून सोशल मीडियावर त्याचे कुत्र्यांसोबत बरेच फोटो आहेत. तसेच सिद्धार्थची गर्लफ्रेंड मिताली मयेकर हिला देखील पाळीव प्राण्यांची खूप आवड आहे.
सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर यांचे सोशल मीडियावर असलेले एकत्र फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांमध्ये हे दोघे अफेअरमध्ये असल्याच्या चर्चा बऱ्याच काळापासून रंगली होती. मात्र मितालीने इंस्टाग्रामवर टाकलेली पोस्ट पाहिल्यानंतर हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे निश्चित झाले आहे. सिद्धार्थने मितालीच्या वाढदिवसादिवशी तिला रिंग देऊन प्रपोझ केले आणि मितालीने त्याला होकारही दिला. त्य़ांची ही पोस्ट पाहिल्यानंतर ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे निश्चित झाले.