​'असेही एकदा व्हावे' सिनेमा राज्य पुरस्काराच्या अंतिम फेरीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 16:46 IST2018-04-05T11:16:03+5:302018-04-05T16:46:03+5:30

दर्जेदार कथानक आणि उत्कृष्ट दिग्दर्शनातून साकार झालेल्या कलाकृतींचा सन्मान करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवामध्ये यंदा 'असेही एकदा व्हावे' ...

'Once Upon A Time' to enter the final of the Cinema State Prize | ​'असेही एकदा व्हावे' सिनेमा राज्य पुरस्काराच्या अंतिम फेरीत दाखल

​'असेही एकदा व्हावे' सिनेमा राज्य पुरस्काराच्या अंतिम फेरीत दाखल

्जेदार कथानक आणि उत्कृष्ट दिग्दर्शनातून साकार झालेल्या कलाकृतींचा सन्मान करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवामध्ये यंदा 'असेही एकदा व्हावे' या सिनेमाला एकूण सहा नामांकनं मिळाली आहेत. सालाबादप्रमाणे यावर्षी होत असलेल्या ५५ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवामध्ये झेलू इंटरटेंटमेंटस निर्मित 'असेही एकदा व्हावे' हा सुश्रुत भागवत दिग्दर्शित सिनेमा अंतिम फेरीत दाखल झाला आहे. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे नामांकन मिळाले असून अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनादेखील सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीचे नामांकनं देण्यात आली आहेत. शिवाय सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री शर्वाणी पिल्लई, सर्वोत्कृष्ट गीतकार वैभव जोशी आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका सावनी शेंडे यांनादेखील पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे.
६ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला अल्पावधीतच मोठी प्रसिद्धी मिळत असून सिनेमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या सिनेमाचे मधुकर रहाणे निर्माते असून त्यांना रवींद्र शिंगणे यांची बहुमूल्य साथ लाभली आहे. सुश्रुत भागवत - शर्वाणी पिल्लई कथा पटकथा लिखित या सिनेमात उमेश तेजश्रीबरोबर शर्वाणी पिल्लई, डॉ. निखिल राजेशिर्के, चिराग पाटील, कविता लाड, अजित भुरे आणि नारायण जाधव या कलाकारांच्यादेखील महत्त्वाच्या  भूमिका आहेत.
उमेश कामत आणि तेजश्री प्रधान या जोडीने सिनेमातील आपापल्या भूमिकेसाठी खास वर्कशॉप जॉइंट केले होते. या सिनेमातील 'यु नो व्हॉट?' ही उमेश आणि तेजश्रीने म्हटलेल्या कवितेला प्रेक्षकांचा उंदंड प्रतिसाद लाभत आहे. यात उमेश कामतने स्वतः गिटार वाजवली असून त्यासाठी त्याने अद्वैत पटवर्धनकडून गिटार वाजवण्याचे खास प्रशिक्षण घेतले. अद्वैतनेदेखील या कवितेला पार्श्वसंगीत देताना उमेशला गिटारीचे कॉर्डस ऑनस्क्रीन लीलया हाताळता येतील, याचे चोख मार्गदर्शन केले होते. तेजश्री प्रधाननेदेखील या सिनेमातील आपल्या आर.जे.च्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली. त्यासाठी तिने आर.जे.चे खास एक महिना प्रशिक्षण घेतले. रेडियो जॉकीचे बोलणे, श्रोत्यांसोबतचा संवाद, शब्दोच्चार, हजरजबाबीपणा आणि मनोरंजन या सर्व गोष्टी तेजश्रीने अभ्यासल्या. तिने रेडिओ स्टेशनला भेटदेखील दिली, आर.जे.च्या कामाचे निरीक्षण करत आणि त्यांच्याशी संवाद साधत आपल्या सिनेमातील आर.जे. किरणच्या व्यक्तिरेखेत प्राण ओतले.

Also Read : सुश्रुत भागवत आणि उमेश कामतची हॅट्रीक

Web Title: 'Once Upon A Time' to enter the final of the Cinema State Prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.