रहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 08:00 IST2018-08-14T16:56:26+5:302018-08-15T08:00:00+5:30
चित्रपटाचे पोस्टर आणि पहिल्या प्रोमोवरून रहस्यावर आधारित हा चित्रपट असल्याचे लक्षात आले होते, मात्र चित्रपटातील पात्रांचा खुलासा यातून झाला नव्हता. ‘Once मोअर’ चित्रपटाच्या टीझर मधून हा खुलासा होणार असून यातून वेगवेगळी पात्र आपल्या भेटीला आली आहेत.

रहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
चित्रपटाची उत्सुकता वाढवणारे ‘Once मोअर’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर आणि त्याची पहिली झलक प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटात नेमकं काय असणार? याविषयी तर्क-वितर्क लढवले जात होते. चित्रपटाचे पोस्टर आणि पहिल्या प्रोमोवरून रहस्यावर आधारित हा चित्रपट असल्याचे लक्षात आले होते, मात्र चित्रपटातील पात्रांचा खुलासा यातून झाला नव्हता. ‘Once मोअर’ चित्रपटाच्या टीझर मधून हा खुलासा होणार असून यातून वेगवेगळी पात्र आपल्या भेटीला आली आहेत.
‘लॉजिकल जगातील मॅजिकल गोष्ट’ अशी टॅग लाईन असलेल्या या टीझरमधून भेटीला आलेली ही सगळी पात्र लक्ष वेधून घेत आहेत. या चित्रपटामधून नेमका कोणत्या गोष्टीचा रहस्यभेद होणार याचा उलगडा १२ ऑक्टोबरला होईलच. तत्पूर्वी चित्रपटाच्या पहिल्या टीझरने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आशुतोष पत्की आणि धनश्री दळवी या नव्या चेहऱ्यांसोबत रोहिणी हट्टंगडी, पूर्णिमा तळवलकर, भारत गणेशपुरे, सुशांत शेलार, विष्णू मनोहर, नरेश बीडकर आदी मराठी सिनेसृष्टीतील अनुभवी कलाकार या चित्रपटात आहेत. ऑक्टोबर
या चित्रपटाचे लेखन श्वेता बिडकर यांनी केले असून दिग्दर्शन नरेश बिडकर यांचे आहे. धनश्री विनोद पाटील आणि सुहास जहागीरदार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विष्णू मनोहर, निलेश लवंदे, अभय ठाकूर सहनिर्माते आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने शेफ विष्णू मनोहर निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतायेत. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी संजय सिंग यांनी सांभाळली आहे. वंशिका क्रिएशन, देवस्व प्रोडक्शन तसेच लवंदे फिल्म व विष्णू मनोहर फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने ‘Once मोअर’ हा मराठी चित्रपट १२ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.