दोन ब्रेकअफ झाल्यानंतर जेव्हा 20 वर्षांनी लहान तरुणीच्या प्रेमात पडला मकरंद...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 15:53 IST2020-04-24T15:53:07+5:302020-04-24T15:53:07+5:30
ती मराठी आणि हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अदिती पोहनकर हिची धाकटी बहीण आहे.

दोन ब्रेकअफ झाल्यानंतर जेव्हा 20 वर्षांनी लहान तरुणीच्या प्रेमात पडला मकरंद...
प्रसिद्ध अभिनेते मकरंद देशपांडेला वेगळ्या परिचयाची गरज नाहीये. रंगभूमीवर रमणा-या मकरंदने हिंदीसह अनेक मराठी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे. 6 मार्च 1966 रोजी जन्मलेल्या मकरंद यांनी वयाची 5२ वर्षे पूर्ण केली आहेत. दोन नावाजलेल्या अभिनेत्रींसोबत ते रिलेशनशिपमध्ये होते. त्यापैकी एक म्हणजे शशी कपूर यांची कन्या संजना कपूर होती.
वयाची 52 वर्षे पूर्ण करणारे मकरंद यांच्या आयुष्यात निवेदिता पोहनकर या तरुणीचे आगमन झाले. निवेदिता आणि मकरंद यांच्या वयात तब्बल 20 वर्षांचे अंतर आहे. 2015 साली हे दोघे लग्न करणार असल्याचे वृत्त आले होते. या दोघांचे लग्न झाले की नाही हे अद्याप उघड झालेले नाही. पण ठिकठिकाणी हे दोघे एकत्र दिसत असतात. यावरुन दोघे बहुदा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असावे असा अंदाज व्यक्त केला जातोय.
निवेदिता पोहनकर हे नाव अद्याप सिनेसृष्टीला तसे नवीनच आहे. निवेदिता एक लेखिका असून पृथ्वी थिएटरशी जुळलेली आहे. रंगभूमीवर काम करत असतानाचा निवेदिता आणि मकरंद यांची भेट झाल्याचे म्हटले जाते. निवेदिताविषयी आणखी सांगायचे म्हणजे ती मराठी आणि हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अदिती पोहनकर हिची धाकटी बहीण आहे. अदितीला आपण रितेश देशमुख स्टारर लय भारी या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर बघितले आहे.
निवेदिता स्पोर्ट्स आणि संगीताची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आहे. तिची आई शोभा पोहनकर या राष्ट्रीय स्तरावरील हॉकी प्लेअर तर वडील सुधीर पोहनकर हे मॅरेथॉन चॅम्पिअन आहेत. तर काका पंडीत अजय पोहनकर हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक आहेत. मकरंद आणि निवेदिता यांच्या भेटीला सात ते आठ वर्षे झाली आहेत.