आता उठणार रेतीचे काळे वादळ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2016 15:39 IST2016-03-24T22:39:01+5:302016-03-24T15:39:01+5:30

  ढासळत्या नीतीमुल्यांच्या महाराष्ट्रात सामाजिक व्यवस्थेवर राजकारणी आणि माफिया टोळ्यांनी केलेला कब्जा हे प्रखर वास्तव मांडणारा ‘रेती’ हा नवा ...

Now the black sand storm rises ... | आता उठणार रेतीचे काळे वादळ...

आता उठणार रेतीचे काळे वादळ...

 
r />
ढासळत्या नीतीमुल्यांच्या महाराष्ट्रात सामाजिक व्यवस्थेवर राजकारणी आणि माफिया टोळ्यांनी केलेला कब्जा हे प्रखर वास्तव मांडणारा ‘रेती’ हा नवा मराठी चित्रपट मतमतांतराचे नवे वादळ उठवण्यासाठी सिद्ध झाला आहे...! काँक्रीटच्या ठिकठिकाणच्या जंगलांसाठी सोन्याच्या भावाने विकली जाणारी रेती आणि या काळ्या साम्राज्यावरच्या सत्तेसाठी वाळुमाफियांनी थेट सरकारी अधिकाºयांवर केलेले जीवघेणे हल्ले, या खळबळजनक सत्य घटनांवर भेदक भाष्य करणाºया या चित्रपटाच्या समाजमाध्यमांवरील पहिल्या काही छायाचित्रांनीच अवघ्या महाराष्ट्राची उत्सुकता चालवली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात बेकायदा आणि अनिर्बंध सुरू असलेला वाळुउपसा आणि मनगटशाहीच्या जोरावर हा धंदा करणाºयांमागचे छुपे हात, हे आता उघड गुपित आहे. कथा, पटकथा आणि संवादलेखक देवेन कापडनीस यांनी ‘रेती’ च्या माध्यमातून या बेलगाम धंद्याचा काळा पट दमदार कथामाध्यमातून विणला आहे, तर त्यातील क्षणाक्षणांचे संघर्षनाट्य दिग्दर्शक सुहास भोसले यांनी प्रेक्षकांपुढे आणले आहे. मात्र विषयाच्या निवडीपासून आशयाच्या मांडणीपर्यंत वास्तवाला भिडणाºया या चित्रपटाचे पॅकेज भले मोठे आहे. जोगवा, पांगिरा, ७२ मैल, या गाजलेल्या चित्रपटांच्या पटकथा, संवाद, गीतांसाठी अनेक पुरस्कार लाभलेले संजय कृष्णाजी पाटील यांनी रेतीसाठी गीते लिहिली असून चित्रपटाला प्रसिद्ध गायक शानने संगीत दिले आहे.
‘रेती’चे सर्वात मोठे आकर्षण या चित्रपटाची स्टारकास्ट आहे. लोकप्रिय आणि जाणता अभिनेता चिन्मय मांडलेकर चित्रपटात शंकर ही प्रमुख भूमिका साकारत असून किशोर कदम (किसन), शशांक शेंडे (गजानन म्हेत्रे), संजय खापरे (सदानंद भामरे), विद्याधर जोशी (नवीन पटेल), गायत्री सोहम (सुली) या प्रसिद्ध कलाकारांनी रेतीवर आपल्या अभिनयाच्या नव्या पाऊलखुणा उमटवल्या आहेत. त्यांच्यासह ज्येष्ठ अभिनेता सुहास पळशीकर, दीपक करंजीकर, मौसमी तोंडवळकर आणि भाग्यश्री राणे ‘रेती’ त चमकणार आहेत. अथर्व मुव्हीज घेऊन येत असलेल्या या चित्रपटाचे निर्माते प्रमोद गोरे असून अरुण रहाणे कार्यकारी निर्माता आहेत. सिनेछायाचित्रण प्रताप नायर यांनी तर संकलन केदार गोगटे यांनी केले आहे. ‘रेती’चे छायाचित्रण नाशिकच्या सटाणा, नामपूर, देवळा या भागात झाले असून येथील मोसम नदीच्या किनाºयानेही आपली प्रातिनिधिक व्यथा या चित्रपटाद्वारे मांडली आहे. या पार्श्वभूमीवर ‘अख्खी मोसम नदी मुंबईच्या समुद्रात रिकामी करणार आपण’ या चिन्मय मांडलेकरने केलेल्या टष्ट्वीटरने प्रेक्षकांना अधीर केले आहे. सावधान... मराठी चित्रपटसृष्टीत ‘रेती’चे वादळ येते आहे!

Web Title: Now the black sand storm rises ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.