नानांना का आवडत नाही आयटम साँग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2017 14:20 IST2017-01-01T14:20:15+5:302017-01-01T14:20:15+5:30
अभिनेते नाना पाटेकर यांनी त्यांच्या चतुरस्त्र अभिनयाने मराठीच काय तर बॉलिवूडमध्ये देखील स्वत:च्या अभिनयाची माहोर उमटविली आहे. आज नानांकडे ...
.jpg)
नानांना का आवडत नाही आयटम साँग
अ िनेते नाना पाटेकर यांनी त्यांच्या चतुरस्त्र अभिनयाने मराठीच काय तर बॉलिवूडमध्ये देखील स्वत:च्या अभिनयाची माहोर उमटविली आहे. आज नानांकडे आदराने पाहीले जाते. नानांचे प्रत्येक चित्रपट हे वेगळ््या विषयावर भाष्य करणार असता. कोणत्याही प्रकारच्या भूमिका अगदी सहजपणे पडदयावर साकारणारा हा नटसम्राट रसिक प्रेक्षकांच्या मनावर कायमच राज्य करीत आला आहे. परंतू तुम्हाला हे माहितीय का, की नानांना चित्रपटात उगाचच असणारे आयटम साँग मात्र आवडत नाही. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नाना सांगतात, आयटम साँग वाईटच आहे. माज्या चित्रपटात आयटम साँग पाहिलंत का? माज्या चित्रपटातलं आयटम साँग म्हणजे मलाच नाचायला लागेल. त्याचंही कौतुक होईल, कारण नाना नाचला. कतरिना कैफ सगळीकडेच नाचते, नाना नाही नाचत. माझा २६/११सारखा चित्रपट असेल तर त्यात आयटम साँग नसणार. अब तक छप्पन सारख्या चित्रपटातही नसेल. अब तक छप्पन २ करताना त्यात एक गाणं टाकायचं असं दिग्दर्शकानं निर्मात्याला कबूल केलं असल्याची बातमी मला मिळाली. तेव्हा मी म्हटलं, ठीक आहे. ते गाणं लागायच्या आधी मधेच मी प्रेक्षकांना सांगेन, माफ करा, या गाण्याचा या सिनेमाशी काही संबंध नाही. कोणाला बाथरूमला जायचं असेल तर जाऊन या. आमच्या निर्मात्यांनी हा व्यवहार कबूल केला होता. मी नाना एक नट म्हणून तुम्हाला ही विनंती करतो. ..आणि खरोखरच मी असं करेन. कदाचित लोकांना तेही आवडेल. त्यामुळे आता प्रेक्षकांना जर वाटत असेल की आपले मराठमोळे नाना एखादया हिंदी चित्रपटात आयटम साँगवर कसे ठुमके लावतील तर त्यांनी या कल्पना करणे देखील सोडुन दयावे. नानांच्या आगामी चित्रपटात तर आपल्याला आता आयटम नंबर दिसणे केवळ अशक्यच आहे एवढेच म्हणावे लागेल.