नीना कुलकर्णी सांगतात, विविध माध्यमांमध्ये काम करायला आवडते

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 10:04 IST2018-02-20T04:34:16+5:302018-02-20T10:04:16+5:30

निना कुलकर्णी यांच्या अद्वितीय अभिनय कारकीर्दीला १९६९ साली सुरूवात झाली. तेव्हापासून, नाटकांपासून चित्रपटांपर्यंतच्या सर्वच माध्यमांतून त्यांनी अथक परिश्रम घेऊन ...

Nina Kulkarni says that she loves to work in different media | नीना कुलकर्णी सांगतात, विविध माध्यमांमध्ये काम करायला आवडते

नीना कुलकर्णी सांगतात, विविध माध्यमांमध्ये काम करायला आवडते

ना कुलकर्णी यांच्या अद्वितीय अभिनय कारकीर्दीला १९६९ साली सुरूवात झाली. तेव्हापासून, नाटकांपासून चित्रपटांपर्यंतच्या सर्वच माध्यमांतून त्यांनी अथक परिश्रम घेऊन आनंदाने अभिनय सादर केला. याचबरोबर, दैनंदिन मनोरंजक मालिका, जाहीराती यांमध्येही कामे करून आता निनाताई वेब सिरीज व लघुपटांच्या नव्या क्षेत्रातही आपला ठसा उमटवत आहेत.

त्या हसतमुखाने सांगतात, ``माझ्यात प्रत्येक कामाची मजा घेण्याची क्षमता आहे, असे मला वाटते. विविध माध्यमांमध्ये प्रयोग करणेही मला आवडते.``

मुंबई लोकलमध्ये पुन्हा एकदा निना कुलकर्णी यांना पाचारण करताना आम्हाला आनंद होतो आहे. प्रत्येक गोष्ट सर्वप्रथम करताना त्यांना आलेल्या विविध अनुभवांविषयी यावेळी आम्ही त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नाटकातून त्यांनी चित्रपटांत सर्वप्रथम पाऊल टाकले, तेव्हा त्यांना नेमके काय वाटले, त्यानंतर चित्रपटांतून दूरदर्शनवर आल्या तेव्हाच्या भावना काय होत्या, जाहीरातीत काम करतानाचा अनुभव कसा होता आणि आता वेब माध्यमात काम करताना त्यांना काय वाटते आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण त्यांच्याकडून मिळवणार आहोत.

या अद्वितीय अभिनेत्रीच्या आयुष्यातील अनेक यशोगाथांनी थक्क होण्यास आता तुम्हीही सज्ज व्हा. विविध माध्यमांमध्ये काम करताना या ज्येष्ठ व गुणी अभिनेत्रीला मानसिक आंदोलनांना सामोरे जावे लागले आहे, त्याविषयी जाणून घेताना प्रेक्षकांनाही भरून येणार आहे. कला कशी जन्म घेते आणि त्यानंतर कलाकाराच्या आयुष्याचा, व्यक्तीमत्वाचा ती एक अविभाज्य भाग कशी बनते, ते अनुभवा. ही हुशार अभिनेत्री स्वतःला आणि तिच्या भूमिकांना सतत ताजेतवाने कसे काय ठेऊ शकते, हेदेखील जाणून घेण्याची ही नामी संधी आहे.


निना कुलकर्णी या ज्येष्ठ अभिनेत्री, मॉडेल, स्तंभलेखिका, निर्माती, दिग्दर्शिका असून त्यांना मराठी व्यावसायिक नाटकांपासून १९७० मध्ये आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली. त्यानंतर, हिंदी प्रायोगिक नाटकांमध्येही त्यांनी कामे केली. त्याचबरोबर, त्यांनी फॅशन शो आणि मॉडलिंगमध्येही आपले करीअर केले.

Web Title: Nina Kulkarni says that she loves to work in different media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.