कुठं कुठं जायाचं हनिमूनला...! सुयश आणि आयुषी या ठिकाणी पोहचले हनिमूनला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 04:47 PM2021-12-23T16:47:20+5:302021-12-23T16:49:26+5:30

Suyash Tilak and Aayushi Bhave : सुयश टिळक आणि आयुषी भावे याचवर्षी 21ऑक्टोबर रोजी सुयश व आयुषी लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर हे दांम्पत्य देवदर्शन करताना दिसलं होतं. आता दोघंही हनिमून साजरा करत आहेत

Newlyweds Suyash Tilak and Aayushi Bhave enjoy a lavish honeymoon in Goa | कुठं कुठं जायाचं हनिमूनला...! सुयश आणि आयुषी या ठिकाणी पोहचले हनिमूनला

कुठं कुठं जायाचं हनिमूनला...! सुयश आणि आयुषी या ठिकाणी पोहचले हनिमूनला

googlenewsNext

मनोरंजन सृष्टीतील एक नवकोर जोडपं म्हणजे सुयश टिळक ( Suyash Tilak )आणि आयुषी भावे (Aayushi Bhave). याचवर्षी 21ऑक्टोबर रोजी सुयश व आयुषी लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर हे दांम्पत्य देवदर्शन करताना दिसलं होतं. आता दोघंही गोव्यात हनिमून साजरा करत आहेत. होय, सुयशने गोव्यात एन्जॉय करतानाचे अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
एका व्हिडीओत सुयश व आयुषी स्वीमिंग पूलमध्ये धम्माल मस्ती करताना दिसत आहेत.

कधी समुद्राकाठी फिरताना, तर कधी सायकलिंग करताना दिसत आहेत. गोव्यात फिरताना, हॉटेलमध्ये वेगवेगळ्या खाद्य पक्वानांचा आस्वाद घेताना, कधी अ‍ॅडव्हेंचर करताना कपल दिसतेय. व्हिडीओत सुयश व आयुषी यांच्या चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा आहे.

सुयशची बायको आयुषी अभिनेत्री आणि नृत्यांगणा आहे. युवा डान्सिंग क्वीन या टीव्ही शोमध्ये ती झळकली होती.

सुशय व आयुषीची भेट एका कार्यक्रमात  झाली होती. पहिल्याच भेटीत दोघांमध्येही खूप चांगली मैत्री झाली होती. बघता बघता दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. पण सुयशने त्याच्या या प्रेमप्रकरणाबद्दल बरीच गुप्तता पाळली होती. मात्र योग्य वेळ येताच  गोड खुलासा करत त्याने चाहत्यांनाही सरप्राईज दिलं होतं. थेट साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.

View this post on Instagram

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

आयुषी आणि सुयश दोघांनाही दाक्षिणात्य संस्कृती फार आवडते. त्यामुळे त्यांनी याच थीमनुसार  साखरपुडा केला होता. यानंतर 21 आॅक्टोबरला दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या.
सुशय टिळक हे नाव ‘का रे दुरावा’ या मालिकेनंतर घराघरात पोहोचले. का रे दुरावा’ या मालिकेतील अभिनेता सुयश टिळक याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ही मालिका संपून अनेक वर्ष झाली असली तरी या मालिकेत त्याने साकारलेली यश ही भूमिका प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. नुकताच सुयशचा ‘हॅशटॅग पे्रम’ हा सिनेमा रिलीज झाला.
 

Web Title: Newlyweds Suyash Tilak and Aayushi Bhave enjoy a lavish honeymoon in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.