/> सेल्फीची झिंग अन फिवर सगळ््यांवरच चढलेला असतो. यामध्ये आपले कलाकारदेखील मागे नाहीत. कोणताही अॅवॉर्ड , कार्यक्रम, शुटिंग्स, पार्टी काहीही असो सेल्फी तर काढणारच. असाच एक सेल्फी सध्या सोशल साईटवर फारच गाजतोय. या सेल्फी मध्ये आपल्याला पहिल्यांदाच कॅमेरॅत एकत्र क्लिक झालेले चेहरे दिसत असल्याने या सेल्फीला आपण एकदम रिफ्रेशिंग अन न्यु फोटो असे म्हणु शकतो. सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर, आदित्य सरपोतदार व आदिनाथ कोठारे यांचा हा फर्स्ट फोटो आहे. सई आणि सिद्धार्थ यांना तर आपण क्लासमेट्स मध्ये एकत्र पाहिले आहे. परंतू आदिनाथ-सिद्धार्थ-सई ही पेअरिंग आपल्याला या क्लिक मध्ये धमाल करताना दिसत आहे. आता हा फोटो त्यांनी जस्ट फन म्हणुन काढलाय कि आगामी कोणत्या चित्रपटात हे त्रिमुर्ती आपल्याला पहायला मिळतील हे तर लवकरच समजेल. सई ताम्हणकरचा वाय झेड हा सिनेमा देखील येतोय मग वाय झेड च्या स्टारकास्टचा हा फर्स्ट लुक तर नसेल ना. ते काहीही असो तुर्तास आपण या फोटोलाच लाईक करुयात.