अवधूतच्या आवाजातलं 'रणांगण' चित्रपटाचं नवं गाणं सोशल मीडियावर सुपरहिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 12:50 IST2018-04-06T07:20:54+5:302018-04-06T12:50:54+5:30

संगीत अवधूत गुप्ते यांनी दिलं आहे. सगळ्यांच्या ओठी असलेल्या या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे या गाण्यात ऐकू येणारे दोन्ही आवाज अवधूत गुप्ते यांचे आहेत.सचिन पिळगांवकरांच्या भूमिकेला साजेसं हे गाणं 52 विक्स एंटरटेनमेंट, ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट मिडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स) आणि हार्वे फिल्म्स निर्मित ‘रणांगण’ या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळणार आहे.

A new song from the movie 'Battleangh' in Avadhuta soundtrack superhit on social media | अवधूतच्या आवाजातलं 'रणांगण' चित्रपटाचं नवं गाणं सोशल मीडियावर सुपरहिट

अवधूतच्या आवाजातलं 'रणांगण' चित्रपटाचं नवं गाणं सोशल मीडियावर सुपरहिट

शमुखांच्या बुध्दीला किमान पुण्यात तरी ऑप्शन नाही,या वाक्याने सुरू होणारा नुकताच लाँच झालेला नाद करायचा नाय या गाण्याचा विडिओ सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर चांगलाच गाजतोय.'दम लय नावात','वट हाय गावात','आपल्याला भिडायचा नाय', 'नाद करायचा नाय' अशा दमदार ओळींनी सोशल मिडियावर धुमाकूळ घातलाय.या गाण्यात वैभव तत्त्ववादी आणि संतोष जुवेकर यांची जुगलबंदी पाहायला मिळते आहे. तर सचिन पिळगांवकरांचे एकापेक्षा एक डॉयलॉग्स या विडिओची जमेची बाजू ठरते आहे. या दमदार गाण्याचे बोल गुरू ठाकूर यांनी लिहिले आहेत. तर संगीत अवधूत गुप्ते यांनी दिलं आहे. सगळ्यांच्या ओठी असलेल्या या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे या गाण्यात ऐकू येणारे दोन्ही आवाज अवधूत गुप्ते यांचे आहेत.सचिन पिळगांवकरांच्या भूमिकेला साजेसं हे गाणं 52 विक्स एंटरटेनमेंट, ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट मिडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स) आणि हार्वे फिल्म्स निर्मित ‘रणांगण’ या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्याची निर्मिती करिष्मा जैन आणि जो राजन यांनी केली आहे.तर अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी आणि कार्तिक निशानदार यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे.तर राकेश सारंग यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.या गाण्याच्यानिमित्ताने मराठीत एका दमदार गाण्याची एंट्री झाल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.



आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूकीत बरेच नवे दावपेच खेळले जाण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. या निवडणूकांत काहीही करून मतं आपल्या खात्यात करण्यासाठी पक्षांमध्ये चुरस रंगली आहे.अशातच प्रसिध्दीच्या शिखरावर असणारे कैक चेहरे येऊ घातलेल्या निवडणुकीचा भाग होण्याचं चित्र नाकारता येत नाही.त्यातच सचिन पिळगांवकरांचा राजकारणी लूक बाहेर आला आणि या ‘अभि’नेत्यांच्या यादीत अजून एक नाव जोडलं जातंय की काय.अशी पाल कित्येकांच्या मनात चुकचुकली.मात्र असं काहीही नसून आगामी ‘रणांगण’ चित्रपटात सचिन पिळगांवकर राजकारण्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.गेली कित्येक वर्ष हिंदी-मराठी सिनेसृष्टीत बालकलाकार ते दिग्दर्शक अशी सगळीच शिखरं सर करणारे सचिन पिळगांवकर आता राजकारणाच्या रणांगणातले डावपेच तितक्याच ताकदीने खेळणार आहेत.नुकताच लाँच झालेल्या लूक पोस्टरमध्ये दिसणारा सचिन पिळगांवकरांचा रोष सचिन पिळगांवकरांची एक वेगळीच बाजू प्रेक्षकांसमोर आणणार असल्याची ग्वाही देतो.शैक्षणिक रणांगणात पेटलेलं हे राजकारण लवकरच प्रदर्शित होणाऱ्या रणांगण या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

Web Title: A new song from the movie 'Battleangh' in Avadhuta soundtrack superhit on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.