नेहा गद्रे 'गडबड झाली' सिनेमाच्या सेटवर झाली आऊट ऑफ कंट्रोल,जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 11:14 IST2018-05-14T05:04:13+5:302018-05-14T11:14:10+5:30
सिनेमाच्या गोष्टी तर रंजक असतातच पण शूटींगच्यावेळी त्याहून रंजक गोष्टी तिथे घडत असतात.त्यातून क्वचितच गोष्टी आपल्या कानावर येतात. अशीच ...

नेहा गद्रे 'गडबड झाली' सिनेमाच्या सेटवर झाली आऊट ऑफ कंट्रोल,जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण?
स नेमाच्या गोष्टी तर रंजक असतातच पण शूटींगच्यावेळी त्याहून रंजक गोष्टी तिथे घडत असतात.त्यातून क्वचितच गोष्टी आपल्या कानावर येतात. अशीच खबर सध्या जोरदार चर्चेत आहे,ती म्हणजे अभिनेत्री नेहा गद्रे गडबड झाली सिनेमाच्या सेटवर आऊट ऑफ कंट्रोल झाली.अनेक लोकांकडून याची माहिती जमा करण्याचा प्रयत्न झाला पण,कुठूनच काही सुगावा हाती लागत नव्हता.मग अखेर सिनेमाचे दिग्दर्शक सन्तराम यांच्याशी संपर्क झाला तेव्हा कुठे या गोष्टीचा खुलासा झाला.Also Read:(मन उधाण वाऱ्याचे फेम नेहा गर्दे कोणासोबत अडकली लग्नबंधनात?)
दिग्दर्शक पुढे सांगतात की,प्रांजली फिल्म प्रॉडक्शन्स प्रस्तुत, डॉ. जितेंद्र राठोड निर्मित, रमेश रोशन सहनिर्माते असलेल्या आमच्या गडबड झाली सिनेमातील एका गाण्याच्या चित्रिकरणासाठी आम्ही कुलू मनालीला गेलो होतो.राजेश शृंगारपुरे आणि नेहा गद्रे वर ते रोमँटिक गाणं चित्रित होणार होतं. आम्ही सर्व तिथे वेळेवर पोहोचलो. मायनस ७ डिग्री तापमान असल्याने आम्ही आधीच गारठलो होतो. अशात दोघांना चित्रित करायचे होते. जरा वेळ चित्रीकरण ठीक होत होतं, परंतु संध्याकाळ होण्याच्या आतच नेहा थंडीने गारठून बर्फावर कोसळली. तिचे हात-पाय बधीर झाले होते. तिच्या तोंडातून शब्द निघत नव्हता. ती अक्षरशः बेशुद्धच पडली. आम्ही इतके घाबरलो होतो कि, तिचे रक्त गोठले कि काय असे वाटू लागले होते. सेटवर तात्काळ शेकोटी पेटवण्यात आली. गरम पाण्याची व्यवस्था करण्यात आली. पण त्याचाही काही उपयोग होईना. अखेर तिकडच्या डॉक्टरांना बोलावले. तिला हॉटेलवर घेऊन जाऊन उपचार केल्यानंतर कुठे मध्यरात्री तिला शुध्द आली आणि लग्गेच ती म्हणाली कि तुम्ही इथे सर्व कसे...? काय झालं....असं विचारू लागली कारण तिला काय घडलं हेच माहिती नव्हतं.
नेहा गद्रे सांगते कि, हा अनुभव मी कधीही विसरू शकणार नाही. खरंच एवढी थंडी होती ना कि पुढे आम्हाला शूटींग करणेच शक्य नव्हते.अखेर आम्हाला लागलीच तिकडून निघावे लागले. मग आम्ही ते शूटींग वसई, पालघर येथे केले. माझ्या सोबत सिनेमात राजेश शृंगारपुरे, विकास पाटील, उषा नाडकर्णी, मोहन जोशी, संजय मोहिते, हर्षा गुप्ते, प्रमोद शिंदे, निरंजन नलावडे, हर्षी शर्मा, प्रतिभा यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत.सिनेमाला रमेश रोशन यांचे संगीत लाभले आहे.