नॅशनल क्रश गिरीजा ओकच्या सौंदर्याचं गुपित आलं समोर, माय-लेकींचे फोटो पाहून नक्कीच कळेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 14:25 IST2025-12-29T14:23:48+5:302025-12-29T14:25:36+5:30
National Crush Girija Oak : मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक 'नॅशनल क्रश' म्हणून प्रसिद्धीझोतात आली आहे. निळ्या साडीतील तिची एक मुलाखत काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली आणि तिचा लूक, साधेपणा चाहत्यांना खूपच भावला. तेव्हापासून ती सातत्याने चर्चेत येत असते.

नॅशनल क्रश गिरीजा ओकच्या सौंदर्याचं गुपित आलं समोर, माय-लेकींचे फोटो पाहून नक्कीच कळेल
मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक 'नॅशनल क्रश' म्हणून प्रसिद्धीझोतात आली आहे. निळ्या साडीतील तिची एक मुलाखत काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली आणि तिचा लूक, साधेपणा चाहत्यांना खूपच भावला. तेव्हापासून ती सातत्याने चर्चेत येत असते. दरम्यान आता तिने नुकतीच तिने सोशल मीडियावर आईसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यातील आईचे फोटो पाहून तिच्या सौंदर्याचं गुपित समोर आल्याचे नेटकरी बोलत आहेत.
गिरीजा ओकने सोशल मीडियावर आईसोबतचे फोटो शेअर करत तिच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिले की, "माझी आई ज्या प्रकारची स्त्री आणि आई आहे, तशी केवळ ५ टक्के जरी मी होऊ शकले, तर मी स्वतःचा विजय समजेन! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई! तू जगात सर्वोत्तम आहेस." गिरीजाच्या या शब्दांमधून तिच्या मनात आईबद्दल असलेला आदर आणि प्रेम दिसून येत आहे.
गिरीजाच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. नेटकरी तिच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत आणि सोबतच अभिनेत्रीच्या सौंदर्यांचं कौतुक करत आहेत.
वर्कफ्रंट
गिरीजा ओकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, ती सध्या 'माय नेम इज गौहर खान' या हिंदी नाटकात काम करतेय. अभिनेत्री नीना कुळकर्णी तिच्यासोबत यात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तिची 'परफेक्ट फॅमिली' ही सीरिज देखील रिलीज झाली आहे. 'ठकिशी संवाद' या मराठी नाटकातही ती काम करतेय. गिरिजाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ओक लवकरच थेरपी शेरपी या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.