अभिमानास्पद..! 'द कश्मीर फाईल्स', RRR पाठोपाठ राहुल देशपांडेंचा 'मी वसंतराव' ऑस्करमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 06:47 PM2023-01-10T18:47:14+5:302023-01-10T20:06:49+5:30

कांतारा, द कश्मीर फाईल्स बरोबरच मी वसंतराव या मराठी चित्रपटाचा समावेश होणे ही मराठी सिनेसृष्टीसाठी आनंदाची आणि गर्वाची बाब आहे.

National award winner Rahul Deshpande's me vasantrao film selected in 95th oscar nominations list | अभिमानास्पद..! 'द कश्मीर फाईल्स', RRR पाठोपाठ राहुल देशपांडेंचा 'मी वसंतराव' ऑस्करमध्ये

अभिमानास्पद..! 'द कश्मीर फाईल्स', RRR पाठोपाठ राहुल देशपांडेंचा 'मी वसंतराव' ऑस्करमध्ये

googlenewsNext

द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस यांनी नुकतीच 95 व्या ऑस्करसाठीची जगभरातील 301 सिनेमांची रिमांइंडर लिस्ट जाहीर करण्यात आली.जगभरातील वेगवेगळ्या भाषेमधील तब्बल ३०० हून अधिक सिनेमांमधील यादित भारतातील कांतारा, गंगूबाई काठियावाडी, द कश्मीर फाईल्स बरोबरच मी वसंतराव या मराठी चित्रपटाचा समावेश होणे ही मराठी सिनेसृष्टीसाठी आनंदाची आणि गर्वाची बाब आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता गायक, संगीतकार राहुल देशपांडे यांनी ही आनंदाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यामातून रसिकांना दिली. 

गायक-अभिनेता राहुल देशपांडे म्हणाले की, “ही खूप आनंदाची गोष्ट आहे  कारण, यानिमित्ताने आम्ही केलेल्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेतली जात आहे, ही अभिमानाची बाब आहे. शिवाय मराठी चित्रपट व संगीत सृष्टीसाठी देखील हे महत्त्वाचे आहे असे मी मानतो. ‘मी वसंतराव’ हा चित्रपट एक वेगळाच प्रयोग होता. यामध्ये माझे आजोबा डॉ. वसंतराव देशपांडे यांचीच कथा मी त्यांचा नातू एक नट म्हणून रसिकांसमोर घेऊन आलो आहे. इतकेच नव्हे तर त्यातील गाणी आणि संगीतदिग्दर्शन हे देखील मी स्वत:च केले असल्याने हा चित्रपट अनेकार्थाने माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. आजच्या या नामांकनाने मला खूप आनंद झाला आहे.


चित्रपटाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी म्हणतात, ''मी वसंतराव' या चित्रपटावर आम्ही तब्बल ९ वर्षं काम केले आहे. एखाद्या महान व्यक्तीचा जीवनपट पडद्यावर दाखवणे हे फार आव्हानात्मक काम होते. पण यात तो काळ, व्यकितमत्वाचे पैलू, निर्मिती प्रक्रिया आणि मुख्य म्हणजे संगीत, हे सर्व निर्माण करण्यासाठी संपूर्ण टीमने अथक प्रयत्न केले आहे आणि याचीच दाद म्हणून आज ऑस्कर सारख्या प्रतिष्ठीत पुरस्काराच्या नामांकन यादीमध्ये मी वसंतरावचा विचार केला जातोय हे खूप अभिमानास्पद आहे .  

Web Title: National award winner Rahul Deshpande's me vasantrao film selected in 95th oscar nominations list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.