​ नाम ने घेतले झरीला दत्तक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 14:41 IST2016-12-16T14:41:09+5:302016-12-16T14:41:09+5:30

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी एकत्र येऊन नाम या संस्थेची स्थापन केल्याचे तर आता सगळ््यांनाच माहिती आहे. या ...

Named by Gorilla Adoption | ​ नाम ने घेतले झरीला दत्तक

​ नाम ने घेतले झरीला दत्तक

ना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी एकत्र येऊन नाम या संस्थेची स्थापन केल्याचे तर आता सगळ््यांनाच माहिती आहे. या संस्थेदवारे हे दोघेही सामाजिक कार्य करत आहेत. दुष्काळग्रस्त गावांसाठी योगदान देण्याचा विडा नाना आणि मकरंद यांनी उचलला आहे. आजपर्यंत त्यांनी अनेक गावांना दत्तक घेतले आहे. सिनेसृष्टीमध्ये नाव कमाविल्यानंतर सुदधा या दोघांनीही आपली सामाजिक जबाबदारी विसरलेली नाही. नाना आणि मकरंद यांच्या कामाचे कौतुक सगळीकडेच केले जात आहे. आता त्यांनी नामच्या वतीने अजुन एक गाव दत्तक घेतल्याचे समजले आहे. राज्यभरात दुष्काळ, शेतकरी आत्महत्या आणि बºयाच सामाजिक कायार्साठी पाऊल उचललेल्या नाम फाऊंडेशनने परभणी जिल्ह्यातील झरी गाव दत्तक घेतले आहे. या गावात जलशिवाराची कामे, वृक्षारोपण, महिला प्रशिक्षण केंद्र अशी अनेक कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे हे गाव पाहण्यासाठी अभिनेते मकरंद अनासपुरे नुकतेच झरीला भेट देऊन आल्याचे समजतेय. एवढेच नाही तर त्यांनी यावेळी गावकºयांना मार्गदर्शन देखील केले असल्याचे जिल्हा समन्वयक सूर्यकांतराव देशमुख यांनी सांगितले. नाम फाऊंडेशनला जनतेकडून देखील मदत करण्यात येते. येणारी मदत योग्यरित्या शेतकºयांना पोहोचविण्यासाठी नाना-मकरंदने 'नाम' नावाच्या संस्थेची स्थापना केलीय. पुण्यातील धमार्दाय सहआयुक्त कार्यालयात नानाने जावून त्यांची अधिकृतपणे नोंदणीही केलीय. एसबीआय बँकेचं अकाऊंट उघडून त्याचा नंबर शेअर करण्यात आलाय. तसंच ज्या परदेशातील नागरिकांना मदत करायचीय त्यांच्यासाठी खास स्विफ्ट कोड देण्यात आलाय. त्यामुळे आता सहजपणे सर्वजण नाना आणि मकरंदच्या या सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता.

Web Title: Named by Gorilla Adoption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.