नागराज चा सैराट डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2016 13:34 IST2016-04-11T20:31:41+5:302016-04-11T13:34:04+5:30
एखादा गाण अस असत कि ते लागल्यावर आपोआपच पाय थिरकायला लागतात अन हळूहळु डान्स करायची ...

नागराज चा सैराट डान्स
एखादा गाण अस असत कि ते लागल्यावर आपोआपच पाय थिरकायला लागतात अन हळूहळु डान्स करायची झिंगच चढते. अशीच झिंग चढलीये ती सैराट नागराज मंजुळे यांना . दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे नागराज मंजुळे जर आपल्याला एकदम सैराट अंदाजात डान्स करताना पहायला मिळाले तर जास्त आश्चर्यचकीत होऊ नका. कारण सध्या त्यांच्यावर झिंग चढलीये झिंगाटची. नागराज मंजुळे त्यांच्या संपुर्ण टिम सह झिंगाट झाले आहेत. नेहमी शांत दिसणारे नागराज मंजुळे असे एकदम सैराट कसे काय झाले वाटत असेल ना तर मग त्याच कारण आहे झिंगाट. सैराट या चित्रपटातील झिंग झिंग झिंगाट हे गाणे सगळीकडे एकदम सुसाट सुटलय. असाच झिंगाटचा फिवर चढलाय मंजुळे यांच्यावर. सैराटचे सर्व कलाकार संगीतकार अजय-अतुल हे सर्वजण एकत्र जमले अन झिंगाट गाणे लावुन मनाला वाटेल तसा अगदी मनमुराद डान्स या सगळ््यांनी केला. नागराज मंजुळे यांच्या बेहतरीन मुव्हज यावेळी पहायला मिळाल्या अन काय खरच त्यांच्या चाहत्यांना मोह वाटेल असा डान्स त्यांनी केला.
दस्तुरखुद्द सैराटांचं झिंगाट …https://www.youtube.com/watch?v=QTUKKcNQB44&feature=youtu.be
Posted by Nagraj Manjule on Sunday, April 10, 2016