फिल्म बाजारमध्ये नागराजची क्रेझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 17:47 IST2016-11-24T16:59:03+5:302016-11-24T17:47:47+5:30

संदीप आडनाईक गोव्यात सुरु असलेल्या एनएफडीसीच्या फिल्म बाजारमध्ये सैराटचे दिग्दर्श्क नागराज मंजुळे यांच्यासाठी प्रथमच दुभाषिक आणावा लागला. फिल्म बाजारमधील ...

Nagraj's Crazy in the film market | फिल्म बाजारमध्ये नागराजची क्रेझ

फिल्म बाजारमध्ये नागराजची क्रेझ

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">संदीप आडनाईक

गोव्यात सुरु असलेल्या एनएफडीसीच्या फिल्म बाजारमध्ये सैराटचे दिग्दर्श्क नागराज मंजुळे यांच्यासाठी प्रथमच दुभाषिक आणावा लागला. फिल्म बाजारमधील सर्व कार्यक्रम सहसा इंग्रजीत चालतात. परंतु स्टोरीज दॅट आर बिईंग टोल्ड इन रिजनल अॅन्ड स्मॉल टाउन इंडिया या नॉलेज सिरीजमध्ये भारतीय प्रादेशिक भाषांच्या चित्रपट निर्मात्यांनी सहभाग घेतला. यात महाराष्ट्र, आसाम आणि कर्नाटकातील चित्रपट दिग्दर्श्कांचा समावेश  होता. महाराष्ट्रातील प्रादेशिक भाषांमध्ये नागराज मंजुळे, आसामचे भास्कर हजारिका आणि कर्नाटकचे राम रेड्डी यांनी आपापल्या चित्रपटांबद्दल बोलले. फिल्म बाजारमध्ये बहुतेक चर्चा सत्रात बोलणारे इंग्रजीत बोलत असतात. परंतु प्रथमच या व्यासपीठावर नागराज मंजुळे यांनी फॅन्ड्री आणि सैराट या चित्रपटातील ग्रामीण समस्यांवर भाष्य करताना मराठी अणि हिंदीत संवाद साधला आणि बहुधा पहिल्यांदाच त्यांच्यासाठी भाषांतर करुन त्यांचे म्हणणो सांगावे लागले. या चर्चासत्रत सर्वाधिक प्रश्नही नागराजलाच विचारण्यात आले, इतकी त्याची लोकप्रियता होती. त्याच्या चित्रपटातील वास्तवता इतकी दाहक आहे, की जी यापूर्वीच्या चित्रपटांत कधी आली नाही, इतके टोकाचे मतप्रदर्शन प्रतिनिधींनी केले. फिल्म बाजारमध्ये आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या ए. आर. रेहमान यांच्यासाठी जेवढा मीडियाचा आणि प्रतिनिधींचा गराडा होता, तितकीच लोकप्रियता ग्रामीण महाराष्ट्रातील नागराजबद्दल होती. त्याच्यासोबत असलेल्या इतर दिग्दर्श्कांनीही नागराजचे कौतुकच केले. 

Web Title: Nagraj's Crazy in the film market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.