‘सैराट’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन सात वर्ष पूर्ण, आर्चीचा परश्याने शेअर केलं पोस्टर, म्हणाला....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 11:03 AM2023-04-29T11:03:52+5:302023-04-29T11:07:16+5:30

परश्या आर्ची आली आर्ची... हा डायलॉग कानावर जरी पडला तरी सैराट चित्रपटातील सीन डोळ्यासमोर उभा राहतो. सैराट चित्रपटाने व त्यातील परशा आणि आर्ची यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते.

Nagraj manjule sairat movie 7 years completed Akash thosar shared special post | ‘सैराट’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन सात वर्ष पूर्ण, आर्चीचा परश्याने शेअर केलं पोस्टर, म्हणाला....

‘सैराट’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन सात वर्ष पूर्ण, आर्चीचा परश्याने शेअर केलं पोस्टर, म्हणाला....

googlenewsNext

प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एक मैलाचा दगड येणं महत्वाचं असतं जिथून त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळते. तसंच काहीस झालं, अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या बाबतीत..२९ एप्रिल, २०१६ला सैराट चित्रपट रिलीज झाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला येड लावलं.  परश्या आर्ची आली आर्ची... हा डायलॉग कानावर जरी पडला तरी सैराट चित्रपटातील सीन डोळ्यासमोर उभा राहतो. सैराट चित्रपटाने व त्यातील परशा आणि आर्ची यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. या चित्रपटातून रिंकू राजगुरूआकाश ठोसर यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. 

‘सैराट’ काय मिळाला आणि आकाश आणि रिंकूचं नशीब एका रात्रीत बदललं. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. आज या चित्रपटाला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने आकाश ठोसरने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन खास पोस्ट शेअर केली आहे. 

आकाशाने अभिनयात करिअर करायचे ठरवले म्हणून त्याने एका ऑडीशनसाठी हजेरी लावली. तेव्हा मात्र या पहिल्याच ऑडिशनमध्ये त्याचे सिलेक्शन झाले. तेही सहाय्यक कलाकार म्हणून नाही तर मुख्य अभिनेता म्हणून झाले.हा चित्रपट होता दिग्दर्शक नागराज मंजूळे लिखीत सैराट. सैराट चित्रपटामुळे आकाशला लोकप्रियता मिळाली. 

आकाशने ‘सैराट’ चित्रपटाचं पोस्टर त्याच्या सोशल मीडियावरुन शेअर केलं आहे. “सैराटला सात वर्ष पूर्ण झाली,” असं कॅप्शन आकाशने या पोस्टला दिलं आहे. आकाश या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. “अजूनही चित्रपट थिएटरला लागला तर आधीसारखी गर्दी होईल, ” अशी कमेंट केली आहे. तर कित्येकांनी “पुन्हा पुन्हा हा चित्रपट पाहावासा वाटतो, ” असंही म्हटलं आहे.
 

Web Title: Nagraj manjule sairat movie 7 years completed Akash thosar shared special post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.