"मला पायलट व्हायचंय, पण...", 'नाळ'मधील चैतूचा 'चला हवा येऊ द्या' मंचावरील व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 04:00 PM2023-11-08T16:00:45+5:302023-11-08T16:01:59+5:30

'नाळ' सिनेमात चैतूची भूमिका साकारलेला बालकलाकार श्रीनिवास पोकळेची प्रेक्षकांबरोबर नाळ जोडली गेली आहे.

naal fame child artist Shrinivas Pokale want to become pilot chal hawa yeu dya video viral | "मला पायलट व्हायचंय, पण...", 'नाळ'मधील चैतूचा 'चला हवा येऊ द्या' मंचावरील व्हिडिओ होतोय व्हायरल

"मला पायलट व्हायचंय, पण...", 'नाळ'मधील चैतूचा 'चला हवा येऊ द्या' मंचावरील व्हिडिओ होतोय व्हायरल

नागराज मंजुळेंच्या 'नाळ' चित्रपटाने प्रेक्षकांच्या हृदयात घर केलं होतं. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील गाणीही लोकप्रिय ठरली होती. आता या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'नाळ २' मधून छोट्या चैतूची पुढची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'नाळ' सिनेमात चैतूची भूमिका साकारलेला बालकलाकार श्रीनिवास पोकळेची प्रेक्षकांबरोबर नाळ जोडली गेली आहे. 'नाळ २'मध्ये हा चैतू मोठा झाला आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. 

'नाळ २'च्या टीमने 'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये हजेरी लावली होती. 'चला हवा येऊ द्या'मधील काही प्रोमो व्हिडिओ झी मराठीच्या ऑफिशियल पेजवरुन शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडिओत निलेश साबळे श्रीनिवासला तुला काय व्हायचं आहे, असं विचारतो. त्यावर श्रीनिवास म्हणतो, "कधी कधी वाटतं अभिनेता बनावं. पण, कसं मध्येमध्ये बदलतही राहतं. आता सध्या मला पायलट बनावसं वाटत आहे. पण, त्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. त्यामुळे असं वाटतं की अभिनयच केलेला बरा...". श्रीनिवासचं हे उत्तर ऐकून निलेश साबळेसह कार्यक्रमात सगळेच हसायला लागले. 

'नाळ २' चित्रपट १० नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित 'नाळ भाग २'मध्ये श्रीनिवास पोकळे, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी, त्रिशा ठोसर आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.या चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या भेटीला आली. 'भिंगोरी' आणि 'डराव डराव' या गाण्यांना प्रचंड व्ह्यूज मिळत आहेत. 

Web Title: naal fame child artist Shrinivas Pokale want to become pilot chal hawa yeu dya video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.