Must See: या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या लहानपणीचे फोटो तुम्ही पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 13:34 IST2017-02-23T07:42:47+5:302017-02-23T13:34:31+5:30

नुकतेच तिने 22 वर्ष पूर्ण करत आपला वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशनही करत 23 वर्षात पदार्पण केले आहे. या चार्मिंग गर्लने आपल्या ...

Must See: Have you seen the pictures of the Maratha actress's childhood? | Must See: या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या लहानपणीचे फोटो तुम्ही पाहिलेत का?

Must See: या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या लहानपणीचे फोटो तुम्ही पाहिलेत का?

कतेच तिने 22 वर्ष पूर्ण करत आपला वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशनही करत 23 वर्षात पदार्पण केले आहे. या चार्मिंग गर्लने आपल्या टॅलेंटने रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलंय.ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून साजुक तूपातली पोरगी असावी अशी सोज्वळ चार्मिंग गर्ल म्हणजे केतकी माटेगावकर.‘टाइमपास’,‘शाळा’, 'तानी' ‘काकस्पर्श’ अशा सिनेमांतून केतकी सगळ्यांच्याच फेव्हरेट अभिनेत्री बनली आहे. मुळात अगदी लहानपणापासूनच घरातूनच केतकीला गायकीचे बाळकडू मिळाले.नुकताच वाढदिवसाचे निमित्त साधत केतकी माटेगांवरची लहानपणाचे फोटो ट्रेडिंग झाल्याचे पाहायला मिळतायेत.  




आपल्या सौंदर्याने रसिकांना घायाळ करणारी केतकी लहानपणीही तितकीच चार्मिंग आणि क्युट दिसायची. बालपणापणापासून केतकीवर अभिनय आणि कलेचे संस्कार घडत होते. बालपणीच्या फोटोतही केतरी सुंदरपणे नटल्याचे पाहायला मिळत आहे.



एका जागी शांत बसलेली केतकीची ही बालपणीची छबी कुणालाही तिच्या प्रेमात पाडेल अशीच आहे. 



तर एका फोटोमध्ये आपल्या आईसह रियाज करताना केतकी दिसते.



तर एका दुस-या फोटोत गाणसम्रातज्ञी लतादिदींसह फोटो काढत असल्याचा आनंद केतकीच्या चेह-यावर साफ दिसतोय. 



लहानपणापासून केतकीने  आपले कलेवर मेहनत घेत वयाच्या अवघ्या 23 वर्षात आज यशस्वी अभिनेत्रींमध्ये नाव मिळवले आहे. केतकीच्या अभिनयाप्रमाणेच रसिक तिच्या सौंदर्यांवरही फिदा होतात. तिचे एक से एक ग्लॅमसर फोटोंवर तिचे चाहते कौतुकाचा वर्षावही करत असतात.सध्या तिचे फोटों सोशल मीडियावर हिट ठरताना पाहायला मिळतायेत.लोखोंच्या संख्येत चाहते असणारी केतकीहीनेही वाढदिवसांच्या शुभेच्छांवर चाहत्यांंचे आभारही मानले आहेत.  निखळ सौंदर्य आणि अभिनय याचा उत्तम मेळ असणा-या केतकीला आमच्या कडूनही तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

Web Title: Must See: Have you seen the pictures of the Maratha actress's childhood?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.