मुक्ता करणार दीपस्तंभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 12:40 IST2016-10-12T08:34:58+5:302016-10-20T12:40:12+5:30
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्या नवीन नाटकाचा मुहुर्त नुकताच पार पडला. दीपस्तंभ असे या ...

मुक्ता करणार दीपस्तंभ
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्या नवीन नाटकाचा मुहुर्त नुकताच पार पडला. दीपस्तंभ असे या नाटकाचे नाव आहे. तिने या नाटकाच्या मुहुर्त संपन्नाचे काही फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. तिने यापूर्वीदेखील कबड्डी कबड्डी, छापा काटा, फायनल ड्राफ्ट, कोडमंत्र या नाटकांमधून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये देखील मुक्ताच्या या नव्या नाटकाची उत्सुकता लागली आहे. या नाटकाचे दिग्दर्शक जयंत जठार यांनी केले केले असून, या नाटकाचे लिखाण प्र. ल. मयेकर यांनी केले आहे. तर या नाटकामध्ये नंदिता धुरी, हरीश दुधाडे या कलाकारांच्या प्रमुmख भूमिका असणार आहेत. त्याचबरोबर मुक्ताने या नाटकाच्या निर्मितीतदेखील हातभार लावला आहे.