सिनेमाचं नाव बदललं, आता मृण्मयी देशपांडेचा 'तू बोल ना'साठी मोठा निर्णय; म्हणाली- "१०० लोकांना..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 18:11 IST2025-10-16T18:10:49+5:302025-10-16T18:11:24+5:30
सिनेमाचं नाव बदलून 'तू बोल ना' असं करण्यात आलं. सिनेमाचं नाव बदलून हा सिनेमा पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आहे. आज या सिनेमाचा प्रिमियर शो पुण्यात पार पडणार असून त्यासाठी खास ऑफर देण्यात आली आहे.

सिनेमाचं नाव बदललं, आता मृण्मयी देशपांडेचा 'तू बोल ना'साठी मोठा निर्णय; म्हणाली- "१०० लोकांना..."
गेल्या काही दिवसांपासून मृण्मयी देशपांडेच्यासिनेमाची चर्चा आहे. मृण्मयीचं लेखन आणि दिग्दर्शन असलेला 'मनाचे श्लोक' सिनेमाच्या नावावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर सिनेमाचं नाव बदलून 'तू बोल ना' असं करण्यात आलं. सिनेमाचं नाव बदलून हा सिनेमा पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आहे. आज या सिनेमाचा प्रिमियर शो पुण्यात पार पडणार असून त्यासाठी खास ऑफर देण्यात आली आहे.
सिनेमाचं नाव बदलल्यानंतर 'तू बोल ना' सिनेमासाठी मृण्मयीने मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यातील सिटी प्राइड कोथरुड येथे 'तू बोल ना' सिनेमाचा प्रिमियर शो गुरुवार(१६ ऑक्टोबर) आहे. त्यानिमित्ताने १०० प्रेक्षकांना 'तू बोल ना' सिनेमाचे फ्री पास मिळणार आहेत. आजच्या प्रिमियर शोसाठी ही खास ऑफर देण्यात आली आहे. याबाबत मृण्मयीने व्हिडीओ शेअर केला आहे. पहिल्या १०० प्रेक्षकांसाठी ही ऑफर असणार आहे.
दरम्यान, 'तू बोल ना' सिनेमात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब अशी तरुणांची तगडी फळी झळकणार आहे. तसेच लीना भागवत, मंगेश कदम, शुभांगी गोखले आणि उदय टिकेकर हे ज्येष्ठ कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. ‘तू बोल ना’ हा चित्रपट स्टारलाईट बॉक्स थिएटर्स आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांच्या माध्यमातून प्रदर्शित होणार असून, निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा आहेत.