मृणाल कुलकर्णी यांनी पतीला खास अंदाजात दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 13:23 IST2021-06-11T13:21:39+5:302021-06-11T13:23:18+5:30

मृणाल कुलकर्णी यांच्या लग्नाचा काल वाढदिवस झाला. त्यांनी काल त्यांच्या पतीसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.

mrinal kulkarni gives wishes to husband for wedding anniversary on social media | मृणाल कुलकर्णी यांनी पतीला खास अंदाजात दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मृणाल कुलकर्णी यांनी पतीला खास अंदाजात दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

ठळक मुद्दे१० जून १९९० रोजी वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी मृणाल कुलकर्णी यांचे लग्न झाले. मृणाल यांचे पती रुचिर कुलकर्णी हे व्यवसायाने वकील आहेत.

कसदार अभिनय आणि आपल्या सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. आजच्या तरुणींनाही लाजवेल असं त्यांचं सौंदर्य असून मराठी आणि हिंदीत त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवलाय. मृणाल कुलकर्णी सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. ते त्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. 

मृणाल कुलकर्णी यांच्या लग्नाचा काल वाढदिवस झाला. त्यांनी काल त्यांच्या पतीसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी या पोस्टसोबत लिहिले आहे की, आपण दोघे खूप चांगली टीम आहोत. तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा...

१० जून १९९० रोजी वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी मृणाल कुलकर्णी यांचे लग्न झाले. मृणाल यांचे पती रुचिर कुलकर्णी हे व्यवसायाने वकील आहेत. बारावीत शिकत असताना मृणाल यांनी 'स्वामी' या मालिकेत पहिल्यांदा काम केले होते. मात्र त्यावेळी याच क्षेत्रात करिअर करावे असे त्यांच्या डोक्यातही नव्हते. मात्र लग्न झाल्यानंतर खर्‍या अर्थाने अभिनय क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहायला लागले, असे मृणाल यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे.

आपल्या नॉनस्टॉप काम करण्याचं श्रेय मृणाल यांनी कायम आपल्या सासूबाई आणि पतीला दिलं आहे. त्यांचा मुलगा विराजस सध्या माझा होशील ना या मालिकेत मुख्य भूमिका साकरत आहे. 

Web Title: mrinal kulkarni gives wishes to husband for wedding anniversary on social media