पुष्कर बनवतोय लहान मुलांवर चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2016 16:01 IST2016-07-29T10:31:34+5:302016-07-29T16:01:34+5:30

अभिनयक्षेत्रात आपले नाव कमवल्यानंतर अभिनेता पुष्कर श्रोतीने एका चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची ...

Movies on Kids | पुष्कर बनवतोय लहान मुलांवर चित्रपट

पुष्कर बनवतोय लहान मुलांवर चित्रपट

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">अभिनयक्षेत्रात आपले नाव कमवल्यानंतर अभिनेता पुष्कर श्रोतीने एका चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची कथादेखील पुष्करनेच लिहिली आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना लहान मुलांचे भावविश्व पाहायला मिळणार आहे. ही कथा शालेयवयातील मुलांवर आधारित आहे. याविषयी पुष्कर सांगतो, शालेयवयातील कथा म्हटली की, ती एक प्रेमकथाच वाटते. पण माझा चित्रपट हा खूपच वेगळा आहे. शाळा ही आपल्या शिक्षणासाठी किती महत्त्वाची असते हा खूपच महत्त्वाचा विषय मी या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याा चित्रपटाची कथा सगळ्यांनाच आवडेल अशी मला खात्री आहे. या चित्रपटाचे सगळे चित्रीकरण झालेले असून एकूण 10 मुले या चित्रपटात आहेत. अनेक नवीन चेहऱ्यांना या चित्रपटात मी संधी दिलेली आहे. तसेच भाग्यश्री शंखपाल, अर्थव पाध्ये यांसारखे काही प्रसिद्ध चेहरेही या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 

Web Title: Movies on Kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.