'वजनदार' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 18:58 IST2016-10-10T12:39:14+5:302016-10-20T18:58:10+5:30
सचिन कुंडलकर दिग्दर्शित वजनदार या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकर, प्रिया बापट, सिद्धार्थ चांदेकर, चेतन चिटणीस, चिराग पाटील या कलाकारांचा या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांनी खास या भूमिकांसाठी वजन वाढवलं आहे

'वजनदार' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
चिन कुंडलकर दिग्दर्शित वजनदार या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकर, प्रिया बापट, सिद्धार्थ चांदेकर, चेतन चिटणीस, चिराग पाटील या कलाकारांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांनी खास या भूमिकांसाठी वजन वाढवलं आहे. या दोघी किती वजनदार झाल्या आहेत, ते या ट्रेलरमधून दिसतं आहे. त्यांच्या जाड असण्याचा आणि त्यानंतर बारीक होण्याचा धमाल प्रवास या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मात्र, त्या बारीक होण्याची धडपड का करू लागतात, हे रहस्य मोठ्या पडद्यावरच पाहण्यात गंमत आहे. 'लॅन्डमार्क फिल्म्स'च्या विधि कासलीवाल यांनी 'वजनदार' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षकांना ११ नोव्हेंबरपर्यत वाट पाहावी लागणार आहे.