लगामचा या चित्रपटाचा मुहुर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 17:47 IST2017-01-05T17:47:47+5:302017-01-05T17:47:47+5:30

 प्रत्येकाला आयुष्यात  कोठेतरी, कधीतरी मनाला, स्वभावाला, वागण्याला बंधन हे घालावयाच लागते. जर हे प्रत्येकाने बंधन नाही घातले, तर त्याला ...

The movie | लगामचा या चित्रपटाचा मुहुर्त

लगामचा या चित्रपटाचा मुहुर्त

 
्रत्येकाला आयुष्यात  कोठेतरी, कधीतरी मनाला, स्वभावाला, वागण्याला बंधन हे घालावयाच लागते. जर हे प्रत्येकाने बंधन नाही घातले, तर त्याला त्याचे नक्कीच परिणाम हे भोगावेच लागतात आणि घातले तर त्याचा फायदाही तेव्हढाच होतोच. तसे हे बंधन आपल्या प्रेमावरही असले पाहीजे. पतीपत्नीचे प्रेम, आईवडिलांचे प्रेम, प्रियकर प्रियसीचे प्रेम, नकळत आपल्या आवडत्या व्यक्तिवर असलले प्रेम. त्या प्रेमाला बंधन नसते. ज्यांना प्रेमाची व्याख्या माहिती नसते, ते देखील प्रेम करायला लागलेत. आता हया प्रेमाचा खूपच अतिरेक व्हायला लागला आहे. इतका कि पतीपत्नी, आर्इ्रवडील, मुले यांच्यात दुरावा व्हायाला लागला आहे. हा दुरावा विकोपाला जावून न्यायालयात खटले उभे राहू लागले आहेत. वर्षोन वर्ष हे खटले न्यायालयात पडून राहीले आहेत. न्यायाच्या प्रतिक्षेत हे अर्जदार बसून आहेत. असाच एक प्रेमावर भाष्य करणारा, पण प्रमाचा अतिरेक न करणारा लगाम या चित्रपटाचा मुहुर्त नुकताच पार पडला. निर्माती आणि दिग्दर्शक मंगला खाडे यांनी आपल्या मंगलम पिक्चर्सच्या बॅनरखाली लगामची निर्मिती केली आहे. चित्रपटाचा मुहुर्त षॉट महिलांची दहीहांडी फोडताना झाला. अनेक नविन कलाकारांनी, ढोल ताषा पथकांनी भाग घेतला होता. आले मी मटकी फोडाया........ या गाण्याला सचिन अवघडे यांनी संगीत दिले आहे. तर या गाण्याला  सचिन कुचेकर यांनी कोरिओग्राफी केली आहे. या धमाल गाण्यावर  अभिनेत्री रूचिका, अभिनेता सुरज, अनंत हे इतर गोविंदा कलाकारांनी पाय थिरकवले आहे.  दिपक गायकवाड यांनी लिहीलेल्या या गीताला गायिका कविता निकम यांनी आवाज दिला आहे. लगाम हा प्रेमाची परिभाषा समजविणारा तसेच आईवडिल आणि मुलगा व त्याची प्रेयसी यांच्या प्रेमाचा नाटयपुर्ण संघर्ष दाख्विणारी कथा व पटकथा स्वत: दिग्दर्षिका मंगला खाडे यांनी लिहीली आहे. मंगला खाडे यांनी या अगोदर खेळ प्रेमाचा आणि माणदेषी वाघीण या दोन चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्षन केले होते. आयुष्यात जिवनाचा खडतर प्रवास भोगलेल्या मंगलाजींनी आपला संसार सांभाळून  इतर दुभंगलेल्या संसारांना  एकत्र आणावयाचे महत्वाचे काम केले आहे. पोलीसांना मदत करणे, इतर सामाजिक कार्यातही त्या सर्तक राहील्या आहेत. त्यांनी केलेल्या या भरीव कायार्मुळे त्यांना पुणे समाजरत्न पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटाचे संवाद दिपाली खाडे यांनी लिहीले आहेत. सुनंदा भोंडवे या सहनिमार्ती असुन छायाचित्रणाची जबाबदारी बुजुर्ग व अनुभवी छायाचित्रकार षांताराम भोसले यांनी सांभाळली आहे. लगाम या चित्रपटात सुरज कांबळे, अनंत भुरड, दिपाली आणि रूचिका भोंडवे या नविन कलाकारांसह मंगला खाडे यांची ही महत्वाची भूमिका आहे.  

Web Title: The movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.