मोहित चौहानचं मराठी सिनेक्षेत्रात पदार्पण; 'घर बंदूक बिरयानी'च्या टायटल ट्रॅकला दिला आवाज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 07:19 PM2023-03-12T19:19:49+5:302023-03-12T19:22:07+5:30

Ghar Banduk Biryani: आशेच्या भांगेची नशा भारी... घर, बंदूक, बिरयानी...'असे या गाण्याचे बोल आहेत. ए.व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला वैभव देशमुख यांचे बोल लाभले आहेत. तर या जबरदस्त गाण्याला बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक मोहित चौहान यांनी आवाज दिला आहे.

Mohit Chauhan debut in Marathi cinema The title track of Ghar Banduk Biryani | मोहित चौहानचं मराठी सिनेक्षेत्रात पदार्पण; 'घर बंदूक बिरयानी'च्या टायटल ट्रॅकला दिला आवाज

मोहित चौहानचं मराठी सिनेक्षेत्रात पदार्पण; 'घर बंदूक बिरयानी'च्या टायटल ट्रॅकला दिला आवाज

googlenewsNext

सध्या सोशल मीडियावर बहुप्रतिक्षीत ठरत असलेल्या 'घर बंदूक बिरयानी' (Ghar Banduk Biryani) या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. 'सैराट' (sairat), 'फँड्री' (fandry), 'पिस्तुल्या' (pistulya) आणि 'झुंड' (zund) यांसारख्या दर्जेदार चित्रपटांनंतर नागराज मंजुळे (nagraj manjule) यांचा 'घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट येतोय. सध्या या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत असतानाच आता चित्रपटाचे  'घर बंदूक बिरयानी' या टायटल ट्रॅकचा मेकिंग व्हिडीओ समोर आला आहे. विशेष म्हणजे हे गाणं प्रसिद्ध बॉलिवूड गायक मोहित चौहान याने गायलं आहे.

आशेच्या भांगेची नशा भारी... घर, बंदूक, बिरयानी...'असे या गाण्याचे बोल आहेत. ए.व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला वैभव देशमुख यांचे बोल लाभले आहेत. तर या जबरदस्त गाण्याला बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक मोहित चौहान यांनी आवाज दिला आहे.

‘’मी पहिल्यांदाच मराठीत असं वेगळं गाणं गात आहे. प्रत्येक गायक हा वेगवेगळ्या भाषेत गात असतो. संगीताला भाषेची मर्यादा नसते. त्यामुळे मराठीत गाण्याचाही मी सुंदर अनुभव घेतला. मी अमराठी असल्याने मला भाषेवर थोडं काम करावं लागलं आणि या सगळ्यात मला संपूर्ण टीमने मदत केली. आतापर्यंत मी नागराज मंजुळे यांचं नाव ऐकून होतो. मात्र या चित्रपटाच्या निमित्ताने आमची भेट झाली आणि आम्ही एकत्र काम केलं. त्यांचा गाण्याच्या अभ्यास, चित्रपटाचा अभ्यास बघून मी थक्क झालो. मराठी सिनेसृष्टीला किती प्रतिभावान टीम लाभली आहे, याचा प्रत्यय आला,’’ असं मोहित चौहान म्हणाला.

गणेश आचार्यच्या तालावर आकाश, सयाजी शिंदेंनी धरला ताल; पाहा 'आहा हेरो'चा making video

दरम्यान, झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' चित्रपटातील 'गुन गुन', 'आहा हेरो' ही दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत. 

Web Title: Mohit Chauhan debut in Marathi cinema The title track of Ghar Banduk Biryani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.