‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यानंतर राज ठाकरे भारावले, म्हणाले, “मी घरी आल्यावर पत्नीला...”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 05:51 PM2023-08-10T17:51:58+5:302023-08-10T17:57:28+5:30

'बाईपण भारी देवा' पाहिल्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले, "प्रत्येक पुरुषाने..."

mns raj thackeray watch kedar shinde baipan bhari deva movie said men must watch this film | ‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यानंतर राज ठाकरे भारावले, म्हणाले, “मी घरी आल्यावर पत्नीला...”

‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यानंतर राज ठाकरे भारावले, म्हणाले, “मी घरी आल्यावर पत्नीला...”

googlenewsNext

केदार शिंदेच्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची क्रेझ काही केल्या संपत नाहीये. ३० जूनला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची महिन्याभरानंतरही बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच आहे. खासकरुन महिला वर्गाच्या मनात या सिनेमाने घर केलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही हा सिनेमा पाहण्याचा मोह आवरता आला नाही. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची भुरळ पडली आहे. राज ठाकरेंनी नुकताच हा सिनेमा पाहिला.

‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यानंतर राज ठाकरे भारावून गेले आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “चित्रपट पाहिल्यानंतर मी घरी येऊन पत्नीला म्हणालो की हा फक्त बायकांनी पाहण्याचा सिनेमा नाही. हा चित्रपट पुरुषांनीही पाहायला हवा. महिला कोणत्या परिस्थितीतून जात असतात, ही गोष्ट पुरुषांनी समजून घेण्याची गरज आहे. महिलांना चित्रपट पाहताना स्वत:ला रिलेट करणं हे साहजिक आहे. पण, त्यातील काही चुकीच्या गोष्टी महिलांच्या आयुष्यातून बाजूला करण्यासाठी, दुरुस्त करण्यासाठी हा सिनेमा पुरुषांनी पाहणं जास्त आवश्यक आहे. बाईपणचं यश हे यातचं आहे, असं मला वाटतं,” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

राहुल गांधी फ्लाइंग किस वाद: प्रकाश राज यांनी स्मृती इराणींनाच सुनावलं, म्हणाले, "मॅडमजी..."

केदार शिंदेंनी राज ठाकरेंचा हा व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओला त्यांनी “सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची "मनसे" प्रतिक्रिया...'बाईपण भारी देवा' सिनेमा पाहिल्यावर त्यांचं म्हणणं तेच आहे, जे मी सिनेमा सादर करताना मांडलं. यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. मात्र आता त्या स्त्रीच्या मागे खंबीरपणे उभं रहाण्याची वेळ पुरूषाची आहे. तीचं मन समजून घेण्यासाठी तिच्या सोबत थिएटर मध्ये जाऊन पहा...” असं कॅप्शन दिलं आहे. केदार शिंदेंनी पुरुषांसाठी खास ऑफर आणली आहे. ११ ऑगस्टपासून ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचं तिकिट पुरुष प्रेक्षकांना १००रुपयांत मिळणार आहे.

“नितीन गडकरींना टॅग करुनही...”, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील टोलच्या तक्रारीनंतर मराठी अभिनेत्री नाराज

दरम्यान, सहा बहि‍णींची अनोखी गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटात रोहिणी हट्टांगडी, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, सुकन्या मोने आणि दीपा परब या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने रितेश देशमुखच्या वेड चित्रपटाचा रेकॉर्ड मोडीत काढत १०० कोटींकडे वाटचाल केली आहे.

Web Title: mns raj thackeray watch kedar shinde baipan bhari deva movie said men must watch this film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.