Ed Sheeran च्या कॉन्सर्टमध्ये मितालीच्या डोळ्यात आलं पाणी; अभिनेत्रीसोबत घडला 'हा' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 10:16 AM2024-03-18T10:16:01+5:302024-03-18T10:17:35+5:30

Mitali mayekar: Ed Sheeran च्या कॉन्सर्टसाठी मिताली तब्बल 8 तास उभी होती.

mitali-mayekar-share-ed-sheeran-mumbai-concert-video-on-instagram-say-we-stand-for-eight-hours | Ed Sheeran च्या कॉन्सर्टमध्ये मितालीच्या डोळ्यात आलं पाणी; अभिनेत्रीसोबत घडला 'हा' किस्सा

Ed Sheeran च्या कॉन्सर्टमध्ये मितालीच्या डोळ्यात आलं पाणी; अभिनेत्रीसोबत घडला 'हा' किस्सा

प्रसिद्ध हॉलिवूड गायक एडवर्ड क्रिस्टोफर शीरन (Ed Sheeran) याचे आज जगभरात असंख्य चाहते आहेत. नुकताच शनिवारी (१६ मार्च) त्याचा मुंबईत कॉन्सर्ट पार पडला. या कॉन्सर्टला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. इतकंच नाही तर लोकप्रिय अभिनेत्री मिताली मयेकर आणि गायिका जुईली जोगळेकर या दोघीही या कॉन्सर्टमध्ये सहभागी झाल्या होत्या.  विशेष म्हणजे या कॉन्सर्टमध्ये मितालीसोबत असा एक किस्सा घडला ज्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आलं.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मितालीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एडवर्ड क्रिस्टोफन शीरनच्या कॉन्सर्टमध्ये तिच्यासोबत घडलेला किस्सा सांगितला. 

मितालीने या कॉन्सर्टमधील एडवर्डचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये एडवर्ड हातात गिटार घेऊन गात होता. विशेष म्हणजे मिताली व्हिडीओ शूट करत असताना त्याने तिला हात दाखवला. इतकंच नाही तर आय कॉन्टॅक्ट करत तिला थम दाखवत प्रतिसादही दिला. त्यामुळे मितालीच्या आनंदाला पारावार उरला नाही. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“आम्ही 8 तास उभे राहिलो आणि ते खऱ्या अर्थाने सार्थकी लागलं....आणि यानंतर आमच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते,” असं कॅप्शन देत मितालीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या कॉन्सर्टला मितालीसोबत सिद्धार्थ चांदेकर, रोहित राऊत, जुईली जोगळेकर या कलाकारांनीही हजेरी लावली होती.

दरम्यान, मुंबईत कॉन्सर्ट केल्यानंतर Ed Sheeran पुन्हा लंडनला परतला आहे. मुंबईमध्ये त्याने पंजाबी गायक दिलजीत दोसांझ याच्यासोबत लाइव्ह कॉन्सर्ट केला होता.

Web Title: mitali-mayekar-share-ed-sheeran-mumbai-concert-video-on-instagram-say-we-stand-for-eight-hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.