मिलिंद शिंदे इन्सपेक्टरच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 15:59 IST2016-07-28T10:29:11+5:302016-07-28T15:59:11+5:30

Exculsive - बेनझीर जमादार              तू तिथे मी या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेले तांबडेबाबा ...

Milind Shinde plays as Inspector | मिलिंद शिंदे इन्सपेक्टरच्या भूमिकेत

मिलिंद शिंदे इन्सपेक्टरच्या भूमिकेत

ong>Exculsive - बेनझीर जमादार
            
तू तिथे मी या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेले तांबडेबाबा म्हणजेच अभिनेता मिलिंद शिंदे हे इन्सपेक्टरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तांबडेबाबा याच नावाने ते आज ही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहे. त्यांची ही भूमिका निगेटिव्ह होती तरी त्यांच्या याच भूमिकेने त्यांना हिरो बनविले आहे. आता हेच तांबडेबाबा प्रेक्षकांना इन्सपेक्टरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. पण त्यांची ही भूमिका पोझिटिव्ह की निगेटिव्ह आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना चौर्य हा चित्रपट पाहावा लागणार असल्याचे अभिनेता  मिलिंद शिंदे यांनी लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, चौर्य या चित्रपटाची कथा एकदम हटके आहे. या चित्रपटात एक असं आगळंवेगळं ठिकाण आहे जिथे घरांना दरवाजे नाही. तिथला लोकांची अशी श्रद्धा आहे की, चोरी करणाºयांना देव शिक्षा करतो. पण एक दिवस त्या मंदिरांमध्ये श्रद्धेला तडा पोहचतो. आणि अंगावर शहारे आणणाºया आणि रोमांचित करणाºया या रहस्यमय घटनेने सुरू होतो चोर आणि श्रद्धेचा शोध. आता हा शोध कसा लागतो, त्यात नेमकी मी पोलिस आॅफीसरची भूमिका कशा पध्दतीने बजावतो या सर्व प्रश्नांचे उत्तर प्रेक्षकांना ५ आॅगस्टला चौर्य या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती नवलाखा आर्टस,  नीलेश नवलाखा, विवेक कजारिया आणि आश्विनी पाटील यांनी केली असून सहनिर्माते राजन आमले आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन समीर पाटील यांनी केले आहे. 
 

Web Title: Milind Shinde plays as Inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.