उल्का गुप्ताला लागली मराठीची ओढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 17:17 IST2016-12-10T17:17:53+5:302016-12-10T17:17:53+5:30

 बॉलिवूड असो या हिंदी मालिका यातील सर्व कलाकार मराठी चित्रपटाच्या प्रेमात पडलेले पाहायला मिळत आहे. आता हेच पाहा ना, ...

Meteor Gupta had the desire of Marathi | उल्का गुप्ताला लागली मराठीची ओढ

उल्का गुप्ताला लागली मराठीची ओढ

 
ॉलिवूड असो या हिंदी मालिका यातील सर्व कलाकार मराठी चित्रपटाच्या प्रेमात पडलेले पाहायला मिळत आहे. आता हेच पाहा ना, झाँसी कि रानी मालिकेतील छोट्या लक्ष्मीबाईची भूमिका साकारणारी अभिनेत्री उल्का गुप्ता ही लवकरच मराठी चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ओढ असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. दिनेश ठाकूर दिग्दर्शित हा चित्रपट असणार आहे. तसेच सोनाली एंटरटेनमेंट हाऊस निर्मित, जी. एस. फिल्मस अकादमी प्रॉडक्शन प्रस्तुत  ओढ.. या मराठी सिनेमाची निर्मिती एस. आर. तोवर यांनी केली आहे. मैत्रीला वयाचे बंधन नसतं पण समवयस्क मुलगा आणि मुलगी यांच्यातही निखळ मैत्री असू शकते यावर समाजाचा विश्वास बसत नाही. अशाच एका निर्मळ मैत्रीची कथा ओढ या चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार आहे. तसेच या चित्रपटात मोहन जोशी, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, शशिकांत केतकर, जयवंत भालेकर अशा तगडया कलाकारांचा समावेश असणार आहे.उल्का सोबत गणेश तोवर हा नवोदित अभिनेता या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. मोहन जोशींच्या मुलीच्या भूमिकेत प्रेक्षकांना उल्का या चित्रपटात पहायला मिळणार आहे. यापूर्वी उल्काने हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटातही काम केले आहे. तेलगु, तमिळ, हिंदी, इंग्लिश भाषांवर प्रभुत्व असणारी उल्का गुप्ता सध्या मराठी भाषेचे धडे गिरवीत असून मराठी वाचनाचाही ती सराव करत आहे, ओढ या चित्रपटाची कथा-पटकथा दिग्दर्शक दिनेश ठाकूर यांचीच असून संवाद गणेश कदम यांनी लिहिलेत. चित्रपटातील गीते अभय इनामदार, संजाली रोडे, कुकू प्रभास, कौस्तुभ यांनी लिहिली असून त्यांना संगीत प्रवीण कुंवर यांनी दिले आहे. सिनेमॅटोग्राफर व्ही. एन. रेड्डी यांचे सुपुत्र रविकांत रेड्डी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करीत आहेत. स्वप्नील बांदोडकर, डॉ. नेहा राजपाल, रोहित राऊत, आनंदी जोशी व जावेद अली या गायकांनी ओढ चित्रपटाची गीते गायली आहेत.


Web Title: Meteor Gupta had the desire of Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.