​ मृण्मयी-भुषणचा गुलमोहर आता बहरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 15:36 IST2016-12-07T15:36:11+5:302016-12-07T15:36:11+5:30

गेल्याच आठवड्यात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे विवाह बंधनात अडकली आहे. मृण्मयीची प्रमुख भूमिका असलेला गुलमोहर हा चित्रपट येत्या ...

Mercury-blossoming will now flourish | ​ मृण्मयी-भुषणचा गुलमोहर आता बहरणार

​ मृण्मयी-भुषणचा गुलमोहर आता बहरणार

ल्याच आठवड्यात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे विवाह बंधनात अडकली आहे. मृण्मयीची प्रमुख भूमिका असलेला गुलमोहर हा चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजे ९ डिसेंबरला प्रदर्शित होतोय. या चित्रपटात मृण्मयीबरोबर भूषण प्रधान याची प्रमुख भूमिका असणार आहे. संदेश गायकवाड यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून श्रीरंग गोडबोले यांनी चित्रपटासाठी गीतलेखन केलेले आहे. अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या बातम्या येत होत्या. परंतू आता हा चित्रपट यंदाच्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण काही वर्षांपुर्वीच झाल्याचे कळतेय. परंतू चित्रपट काही कारणास्तव उशीरा प्रदर्शित होत असल्याचे दिसतेय. या चित्रपटातील मृण्मयी आणि भुषणचे लुक पाहता हा सिनेमा अनेक वर्षांपुर्वी चित्रीत करण्यात आला आहे असेच वाटतेय. सध्या मृण्मयी तिच्या लग्नानंतरचे दिवस एंजॉय करीत आहे. तर अभिनेता भुषण प्रधान देखील त्याच्या काही चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. त्यामुळे गुलमोहर या चित्रपटाचे आता प्रदर्शन जरी जवळ आले असले तरी या चित्रपटाचा कुठेही गाजावाजा झालेला नाही. चित्रपटाचे प्रमोशन देखील करण्यात आले की नाही हे काही समजलेले नाही. आता थेट हा चित्रपट येत्या शुक्रवारी थिएटरमध्ये लागणार असल्याचे समजतेय. मृण्मयी आणि भुषणचा हा गुलमोहर आता किती बहरतोय हे तर आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल.

Web Title: Mercury-blossoming will now flourish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.