चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2016 09:45 IST2016-05-07T04:15:01+5:302016-05-07T09:45:01+5:30
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये सर्मथ पॅनेलने १४ पैकी १२ जागा जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले. समर्थ पॅनेलप्रमुख मेघराज ...

चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले
अ िल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये सर्मथ पॅनेलने १४ पैकी १२ जागा जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले. समर्थ पॅनेलप्रमुख मेघराज राजेभोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी छायाचित्रण विभागाचे धनाजी यमकर यांची निवड करण्यात आले आहे. खजिनदार म्हणून निर्मिती व्यवस्थापनाचे संजय ठुबे यांची बिनविरोध निवड झाली, तर कोल्हापूर महामंडळाच्या कार्यवाहकपदी कामगार विभागाचे रणजित जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी बोलताना राजेभोसले म्हणाले की, अध्यक्ष म्हणून काम करताना मी सर्वप्रथम चित्रनगरी व जयप्रभा स्टुडिओचा प्रश्न मार्गी लावणार आहे. महामंडळ डिजिटल करून २५ हजार सभासदांना एकत्र आणण्याचा यशस्वी प्रयत्न येत्या ६ महिन्यांत केला जाणार आहे. महामंडळ कसे काम करते, त्याचा कारभार कसा चालतो हे सभासदांना यामुळे थेट समजले जाईल. स्वच्छ व पारदश्री व्यवहार करून महामंडाळाला ऊर्जितावस्था देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करणार आहे. गेल्या काही वर्षांत पारदश्रीपणा नसल्याने गोंधळ माजला होता. त्यात भ्रष्टाचार केलेल्यांची चौकाशी करून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.क्रियाशील पॅनेलचे पॅनेलप्रमुख अभिनेते विजय पाटकर यांची मात्र अनुपस्थिती होती. यावेळी रामदास फुटाणे, विलास रकटे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्ष निवडीसाठी सर्मथ पॅनेलचे सर्व उमेदवार उपस्थित होते. निवडणूक अधिकारी अँड़ के. व्ही. पाटील,आकाराम पाटील, पद्माकर कापसे यांनी या निवडणुकीचे काम पाहिले.