मयुरेश पेम ही झळकणार एफयू चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 17:21 IST2017-01-05T17:21:47+5:302017-01-05T17:21:47+5:30

सध्या महेश मांजरेकर दिग्दिर्शत एफयू या चित्रपटाची चर्चा रंगू लागली आहे. या चित्रपटात कित्येक तरूण कलाकार पाहायला मिळणार आहे. ...

Mayuresh Pem will be seen in the Fu film | मयुरेश पेम ही झळकणार एफयू चित्रपटात

मयुरेश पेम ही झळकणार एफयू चित्रपटात

्या महेश मांजरेकर दिग्दिर्शत एफयू या चित्रपटाची चर्चा रंगू लागली आहे. या चित्रपटात कित्येक तरूण कलाकार पाहायला मिळणार आहे. सातत्याने एकापाठोपाठ एक कलाकारांच्या नावांचा उघड होत असल्याचे दिसत आहे. नुकतेच माधव देवचक्के हा अभिनेता या चित्रपटात झळकणार असल्याचे कळाले होते. आता या कलाकारांच्या पाठोपाठ या चित्रपटात अभिनेता मयुरेश पेमदेखील झळकणार असल्याचे कळत आहे. मयुरेश हा झाला बोभाटा या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याचा हा चित्रपट ६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. त्याच्या या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, भाऊ कदम, संजय खापरे, मोनालिसा बागल, कमलेश सावंत या कलाकारांचादेखील समावेश आहे. या चित्रपटातील पैंजण हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. मयूरेश या चित्रपटात रोमँण्टिक भूमिकेत पाहायला मिळणात आहे. तसेच आता त्याच्या या चित्रपटानंतर तो थेट महेश मांजरेकर यांच्या चित्रपटात झळकणार असल्याने त्याला लॉटरी लागली असे म्हणण्यास हरकत नाही. या चित्रपटात त्याच्यासोबत सत्या मांजरेकर, संस्कृती बालगुडे, आकाश ठोसर, मधुरा देशपांडे या कलाकारांचा ही समावेश असणार आहे. या चित्रपटात सैराट या चित्रपटातील परश्या म्हणजेच आकाश ठोसर असल्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली असल्याचे दिसत आहे. या सर्व कलाकारांची नावे पाहता, एफयूमध्ये मराठी इंडस्टीमधील सर्व नवोदित चेहरे पाहायला मिळणार असे वाटते. मयूरेशने यापूर्वी रंगभूमीवरदेखील आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. सध्या तो सौजन्याची एैशीतेशी आणि आॅल द बेस्ट या नाटकात दिसत आहे. आता त्याला एफयू या चित्रपटात  झळकण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे त्याच्या करिअरला चार चाँद लागेल आहे असे म्हणण्यास हरकत नाही. 


 

Web Title: Mayuresh Pem will be seen in the Fu film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.