​वंटास ४ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 09:57 AM2018-04-05T09:57:49+5:302018-04-05T15:27:49+5:30

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ग्रामीण प्रेमकथांचा ट्रेंड आला आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. सैराट या चित्रपटातील ग्रामीण भागातील ...

From May 4 to entire Maharashtra, | ​वंटास ४ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात

​वंटास ४ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात

googlenewsNext
ाठी चित्रपटसृष्टीत सध्या ग्रामीण प्रेमकथांचा ट्रेंड आला आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. सैराट या चित्रपटातील ग्रामीण भागातील प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तसेच नुकत्याच आलेल्या बबन हा चित्रपट देखील त्याच धाटणीतला होता. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणारा वंटास हा चित्रपट देखील त्याच धर्तीचा असला तरी या चित्रपटात काही वेगळ्या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. वंटास या चित्रपटात प्रेक्षकांना नवी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियाद्वारे नुकताच लाँच करण्यात आला आहे. गुरूकृपा प्रॉडक्शन एन्टरटेन्मेंटच्या अमोल बापूराव लवटे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून ज्ञानेश्वर यादव राव उमक यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 
"वंटास" ही कथा आहे गौरी आणि आंब्या यांची... उनाडक्या करणारा आंब्या गौरीच्या नकळतपणे प्रेमात पडतो आणि तिला मिळवण्यासाठी त्याला काय काय करावे लागते याची ही 'वंटास' गोष्ट या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अजय वरपे, स्नेहल, अक्षय माहूलकर, रमेश वेदपाठक हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. 
सध्या वेगळ्या नावाच्या चित्रपटांचा ट्रेंडच मराठी इंडस्ट्रीमध्ये आला आहे आणि त्यामुळेच वेगवेगळ्या नावाचे चित्रपट प्रेक्षकांना मराठी चित्रपटसृष्टीत पाहायला मिळत आहेत. वंटास हा देखील एका वेगळ्या नावाचा चित्रपट असल्याने या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटातील अनेक कलाकार हे नवीन असल्याने या चित्रपटातील कलाकारांविषयी देखील प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. वंटास हा शब्द तरुणांमध्ये सहसा वापरला जातो. त्यामुळे या नावामुळे तरुण वर्ग या चित्रपटाकडे आकर्षिला जाईल यात काहीच शंका नाही. 
वंटास हा चित्रपट कसा आहे हे जाणून घेण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार असून ४ मे ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: From May 4 to entire Maharashtra,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.