'स्वतःला great म्हणण्यापेक्षा आंबे विकलेले बरे'; ट्रोल करणाऱ्याला प्रथमेशचं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 05:09 PM2024-04-02T17:09:43+5:302024-04-02T17:10:17+5:30

Prathamesh laghate: प्रथमेशने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या आंबा विक्री व्यवसायाची माहिती दिली होती. मात्र, काही जणांनी त्याला ट्रोल केलं.

marathi singer Prathamesh lagates reply to the troll | 'स्वतःला great म्हणण्यापेक्षा आंबे विकलेले बरे'; ट्रोल करणाऱ्याला प्रथमेशचं सडेतोड उत्तर

'स्वतःला great म्हणण्यापेक्षा आंबे विकलेले बरे'; ट्रोल करणाऱ्याला प्रथमेशचं सडेतोड उत्तर

सारेगमप लिटिल चॅम्प फेम प्रथमेश लघाटे (prathamesh laghate). त्याच्या उत्तम गायिकीसोबतच फॅमिली बिझनेसमुळेही चर्चेत येत असतो. प्रथमेशचा आंबे विक्रीचा पुर्वापार चालत आलेला व्यवसाय असून या बिझनेसची धुरा आता तो सांभाळत आहे. नुकतीच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या व्यवसायाची माहिती चाहत्यांना दिली. मात्र, त्याची ही पोस्ट पाहिल्यावर काहींनी त्याला ट्रोल केलं. मात्र, प्रथमेशने या ट्रोलर्सला नेहमीप्रमाणे सडेतोड उत्तर देत गप्प केलं आहे.

प्रथमेशची पोस्ट पाहिल्यावर एका युजरने त्याच्याकडून आंबे घेऊन नका, अशी कमेंट केली. त्याच्यावर प्रथमेशनेही त्याला त्याच्याच शब्दांत उत्तर दिलं. इतकंच नाही तर फेक आयडीवरुन कमेंट करणाऱ्या या व्यक्तीची त्याने चांगलीच शाळा घेतली.

'शेतकऱ्यांकडून घेऊ, तुमच्या कडून कधीच नाही', अशी कमेंट एका युजरने केली होती. त्यावर, 'कुठूनही घ्या हो..पण आंबे खा आणि थंड व्हा', असा रिप्लाय प्रथमेशने दिला. त्याच्या या रिप्लायवर या युजरने आणि एक कमेंट करत त्याला ट्रोल करायचा प्रयत्न केला.  'कुठूनही नाही..फक्त शेतकऱ्यांकडूनच', अशी नवीन कमेंट या ट्रोलरने केली. मात्र, यावर प्रथमेशने सडेतोड उत्तर दिलं.
 

प्रथमेश लघाटेने सुरु केला आंब्यांचा व्यवसाय; गायनासोबत सांभाळतोय कुटुंबाचा बिझनेस

काय म्हणाला प्रथमेश?

"कुठूनही म्हणजेच कोणत्याही शेतकऱ्याकडून.. simple..माझी भाषा तुम्हाला समजायला खूपच अवघड जाते आहे असं दिसतंय.. तुमचं नाव तर विवेक दिसतंय पण प्रत्यक्षात सद् सद् विवेक मात्र आजारी आहे.. त्यात स्वतःची खरी ओळख लपवावी लागते insta वर.. followers ही 0. त्यामुळे नकाच घेऊ तुम्ही आमच्याकडून आंबे.. कारण स्वतःची ओळख लपवणाऱ्यांनी एखाद्या बरी ओळख असणाऱ्याकडून आंबे घेणं शोभत नाही आण्णा..स्वतःहूनच स्वतःला great म्हणण्यापेक्षा आंबे विकलेले बरे.. आणि एवढं इनकम असूनही follower शून्यच??"

दरम्यान, प्रथमेशने ट्रोल करणाऱ्यांना त्याच्या चपखल भाषेत चांगलंच उत्तर दिलं आहे. इतकंच नाही तर त्याची ही पोस्ट पाहिल्यावर काहींनी त्याला पाठिंबा दिला तर काहींनी मात्र ट्रोल केलं.  परंतु, प्रथमेशचा हा फॅमिली बिझनेस असून गेल्या कित्येक वर्षांपासून ते आंब्यांची विक्री करत आहेत.

Web Title: marathi singer Prathamesh lagates reply to the troll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.