​हृतिक रोशन काम करणार विक्रम फडणीसच्या हृद्यांतर या मराठी चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2017 10:47 IST2017-03-02T04:28:52+5:302017-03-02T10:47:35+5:30

मराठी इंडस्ट्रीत सध्या चांगल्या विषयांवरचे चित्रपट येत आहे. मराठी चित्रपटांची कथा ही बॉलिवूड चित्रपटांपेक्षाही सरस असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. ...

In the Marathi film Hrithik Roshan works on the heart of Vikram Phadnis | ​हृतिक रोशन काम करणार विक्रम फडणीसच्या हृद्यांतर या मराठी चित्रपटात

​हृतिक रोशन काम करणार विक्रम फडणीसच्या हृद्यांतर या मराठी चित्रपटात

ाठी इंडस्ट्रीत सध्या चांगल्या विषयांवरचे चित्रपट येत आहे. मराठी चित्रपटांची कथा ही बॉलिवूड चित्रपटांपेक्षाही सरस असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीने बॉलिवूड कलाकारांनाही आपल्याकडे आकर्षित करून घेतले आहे. आता अनेक दिग्गज बॉलिवूड कलाकार आपल्याला मराठी चित्रपटात काम करताना पाहायला मिळत आहे. सलमान खानने लई भारी या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती आणि आता हृतिक रोशन एका मराठी चित्रपटात झळकणार आहे.
विक्रम फडणवीस दिग्दर्शित करत असलेल्या हृदयांतर या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटाचा मुहूर्त शाहरुख खानच्या हस्ते पार पडला होता. यावेळी अभिनेता अर्जुन कपूरही उपस्थित होता. आता या चित्रपटात हृतिक रोशन काम करणार आहे. 

hrithik roshan marathi movie

हृतिकची मराठी चित्रपटात काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हृतिकने ट्वीट करून याबद्दल स्वतः सांगितले आहे. त्याने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "काल मी माझा जवळचा मित्र विक्रम फडणीसच्या हृद्यांतर या चित्रपटासाठी खूप चांगल्या कलाकारांसोबत चित्रीकरण केले." तसेच त्याने या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे काही फोटोदेखील पोस्ट केले आहेत. 
हृदयांतर चित्रपटाची कथा हृदयस्पर्शी असून या चित्रपटात सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. एका दाम्पत्याची त्यांच्या वैवाहिक जीवनातली वादळांशी असलेली झुंज दाखवणारा हा सिनेमा आहे. या चित्रपटात मनिष पॉलदेखील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात तो मनिष पॉल हीच व्यक्तिरेखा साकारणार आहे.  या चित्रपटातील त्याचे दृश्य हे लहान मुलांसोबतचे आहे. एका शाळेच्या खेळ महोत्सवात तो एक सेलिब्रेटी म्हणून येतो असे चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

 

Web Title: In the Marathi film Hrithik Roshan works on the heart of Vikram Phadnis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.