"बसमध्ये सीटच्या मागून एकाने कमरेला हात लावला अन्...", सई ताम्हणकरने सांगितला 'तो' धक्कादायक प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 14:21 IST2025-07-06T14:17:45+5:302025-07-06T14:21:44+5:30
"बसमध्ये सीटच्या मागून एकाने कमरेला हात लावला आणि...", सई ताम्हणकरला प्रवासादरम्यान आलेला विचित्र अनुभव

"बसमध्ये सीटच्या मागून एकाने कमरेला हात लावला अन्...", सई ताम्हणकरने सांगितला 'तो' धक्कादायक प्रसंग
Sai Tamhanakar : सार्वजनिक वाहतूक करताना अनेकदा चांगले-वाईट अनुभव येतात. अगदी सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटीमंडळींनाही अशा समस्यांना सामोरं जावं लागतं. अशातच मराठी कलाविश्वातील लोकप्रिय मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने (Sai Tamhanakar) एका मुलाखतीत सांगली ते मुंबई प्रवासादरम्यान तिला आलेला एक विचित्र अनुभव शेअर केला आहे.
अलिकडेच सई ताम्हणकरने हॉटरफ्लाईला मुलाखत दिली. त्यामध्ये तिने सांगितलं, "मी जेव्हा कामाची सुरुवात केली होती तेव्हा सांगलीहून मुंबईपर्यंतचा प्रवास बसने करायचे. रात्रीची बस पकडायची, जी मला सकाळी मुंबईला पोहोचवायची. एकदा प्रवास करताना मी बसमध्ये बसले होते. त्यावेळी माझ्या मागच्या सीटवर एक मुलगा बसलेला होता. मग अचानक त्याचा हात मागून माझ्या कमरेजवळ आला. त्याने माझ्या कमरेला हात लावला. मी गोंधळले, क्षणभर काहीच समजलं नाही की नक्की काय झालं? पण, लगेच मी त्याचा हात पकडला, जोरात ओढला आणि त्याला मुरगळला."
त्यानंतर सईने म्हटलं," तो मुलगा जोरात किंचाळला, कारण मी त्याचा हात खूप जोरात मुरगळला होता. मला अशा गोष्टींची भीती वाटत नाही. मी त्याला ठामपणे सांगितलं, ‘पुन्हा असा हात आला, तर तुला वेगळा झालेला हात मिळेल." असा किस्सा अभिनेत्रीने शेअर केला.
सई मराठीत तर काम करतच आहे. पण, बॉलिवूडमध्येही तिनं आपलं नाव गाजवलं आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'द सीक्रेट ऑफ शिलेदार्स'च्या दमदार यशानंतर सई अभिनेता इमरान हाश्मीसोबत 'ग्राऊंड झिरो'मध्ये पाहायला मिळाली.