"अजून चांगली परिस्थिती यायला...", मराठी चित्रपटांना मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल उमेश कामतचं मत, काय म्हणाला? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 11:41 IST2025-07-06T11:36:32+5:302025-07-06T11:41:11+5:30

मराठी सिनेसृष्टीत सध्या वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

marathi cinema actor umesh kamat opinion on the response to marathi films by audience  | "अजून चांगली परिस्थिती यायला...", मराठी चित्रपटांना मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल उमेश कामतचं मत, काय म्हणाला? 

"अजून चांगली परिस्थिती यायला...", मराठी चित्रपटांना मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल उमेश कामतचं मत, काय म्हणाला? 

Umesh Kamat: मराठी सिनेसृष्टीत सध्या वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटांमध्ये कलाकारांच्या अभिनयाबरोबरच त्याच्या आशलाही तितकचं प्राधान्य दिलं जात आहे. त्यात आता कलाविश्वात सध्या 'ये रे येरे पैसा-३' चित्रपटाबद्दल जोरदार चर्चा सुरु आहे. पहिले दोन भागांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर लवकरच 'ये रे येरे पैसा-३' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता उमेश कामतने (Umesh Kamat) केलेल्या वक्तव्याची सगळीकडे चर्चा आहे. 

चित्रपट, नाटक, मालिका, वेबसीरिज अशा माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारा अभिनेता उमेश कामत. अलिकडेच त्याने 'सकाळ प्रिमिअर'ला दिलेल्या मुलाखतीत मराठी चित्रपटांना मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्यादरम्यान अभिनेता म्हणाला, "मराठी प्रेक्षक वेळ काढून, पैसे खर्च करून, काही अंतर चालून आणि तिकीट बुक करुन थिएटरमध्ये येत आहेत त्यांचा वेळ देत आहेत. अशा परिस्थितीत आपण सगळ्यांनी मराठी चित्रपटांचा विचार केला तर सगळीकडे बोंबाबोंब होत होती की, मराठीत चांगले सिनेमे बनत नाहीत किंवा ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीत."

त्यानंतर उमेशने म्हटलं," हे सगळं ऐकत असताना मला माहीत आहे की, अजून चांगली परिस्थिती यायला हवी. पण तरीही चित्रपट चालत असल्याची बाब आम्हा कलाकारांसाठी सुखावणारी आहे आणि कुठे तरी एक आशा देणारी आहे. कलाकारच नव्हे, तर अनेक निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ मंडळींसाठी ही चांगली गोष्ट आहे. कुठे तरी एक उमेद मिळाली की, आणखी चांगलं काम केलं जातं आणि त्यामुळे अजून चांगले सिनेमे बनवले जातात. आपण प्रत्येक वेळेला इतर भाषेतील चित्रपटांची उदाहरणे देत असतो, त्यांचं कौतुक करतो. म्हणून आपण आपल्याला वाईट म्हणण्याची गरज नाही. शिवाय आपण किती कमी पडत आहोत? हे सांगण्याऐवजी आपण प्रयत्न करायला पाहिजे." असं म्हणत अभिनेत्याने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या. 

धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर ॲरो पिक्चर्स निर्मित या चित्रपटाची सहनिर्मिती वर्डविझार्ड एंटरटेनमेंटने केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले आहे. कलाकारांच्या चमकदार यादीत संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांच्यासह आणखी काही चर्चित चेहरे दिसणार आहेत. ‘येरे येरे पैसा ३’ हा सिनेमा १८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: marathi cinema actor umesh kamat opinion on the response to marathi films by audience 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.