"त्यातून घटस्फोटाचं प्रमाण...", लोकेश गुप्तेचं लिव्ह इन रिलेशनशीपवर स्पष्ट मत, म्हणाले- "पटलं तर ठीक नाहीतर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:32 IST2025-06-24T12:28:39+5:302025-06-24T12:32:25+5:30

लोकेश गुप्तेचं लिव्ह इन रिलेशनशीपवर स्पष्टच मत, म्हणाले- "पटलं तर ठीक नाहीतर..."

marathi cinema actor lokesh gupte clear opinion on live in relationship says | "त्यातून घटस्फोटाचं प्रमाण...", लोकेश गुप्तेचं लिव्ह इन रिलेशनशीपवर स्पष्ट मत, म्हणाले- "पटलं तर ठीक नाहीतर..."

"त्यातून घटस्फोटाचं प्रमाण...", लोकेश गुप्तेचं लिव्ह इन रिलेशनशीपवर स्पष्ट मत, म्हणाले- "पटलं तर ठीक नाहीतर..."

Lokesh Gupte On live in Relationship: बदलत्या काळानुसार समाजात  अनेक नवनवीन संकल्पना रुढ व्हायला लागल्या आहेत. त्यातील एक महत्वाची संकल्पना म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप. गेल्या काही वर्षभरामध्ये तरुण पिढीने लिव्ह इन रिलेशनशिपचा मार्ग स्विकारला आहे. हल्ली अनेक कपल्स हा निर्णय घेतात. लग्नापूर्वी एकत्र राहण्यास, आपल्या जोडीदाराला समजून मग लग्नाचा निर्णय घेणं असंही काहीजण करतात. आता या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या मुद्यावर मराठी  मराठी अभिनेता लोकेश गुप्ते यांनी भाष्य केलं आहे.


नुकतीच लोकेश गुप्ते आणि चैत्राली गुप्ते यांनी 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान लोकेश यांनी लिव्ह इनबद्दल मत मांडलं. त्यादरम्यान ते म्हणाले-, "लिव्ह इन बद्दल हरकत काहीच नाही असं मला वैयक्तिक वाटतं.  जसं आपण मगाशी म्हणत होतो ना की लग्नानंतर आपण एकमेकांना समजून घेतो घ्यायचो. पण, आताची पिढी अशी बदलली आहे. शिवाय जग इतक जवळ आलंय सगळ्या गोष्टी त्यामुळे आता पारखूनच सगळ्या गोष्टी घेतात. कारण त्यांची कॅल्क्यूलेशन्स सगळी ठरलेली आहेत एक आयुष्य म्हणून आयुष्यात काय कॅल्क्यूलेट करायचं कुठल्या टप्प्यावर मला काय हवंय हे इतकं क्लॅरिटी आहे इतकं फोकस्ड आहेत मग त्याच्यामध्ये घर,गाडी, बंगल्यासकट नवरा पण येतो किंवा पार्टनर सुद्धा येतो. नवऱ्यापेक्षा पार्टनर म्हणतो मी तोही मला असाचं हवायं. मग त्याच्यासाठी तो दिला जाणारा वेळ जसं एखाद्या गोष्टीसाठी आपण वेळ देतो तसाच माझा जोडीदार मला कसा हवायं? हे पारखून घेण्यासाठी म्हणून दिलेला हा वेळ असतो. "

त्यानंतर लोकेश गुप्ते म्हणाले, "आता ती क्लॅरिटी एवढी आहे त्यांच्याकडे की पटलं तर ठीक नाहीतर आपण आपले वेगळे होऊया. खरंतर ही चांगली गोष्ट आहे त्यातून पुढे जाऊन घटस्फोटाचं प्रमाण ते तरी कमी होणार आहे. कारण काय होतं अॅडजस्टमेन्टची सवय प्रत्येकाला असतेच असं नाही.  म्हणजे मला तेच म्हणायचं की समजा यातून हे नाही केलं आणि लग्न झालं किंवा नंतर काही गोष्टी कळल्या आणि घटस्फोट झाला. मग घटस्फोटाचं प्रमाण का वाढलंय? या का मागचा तुम्ही विचार करता का? मग अशी अनेक कारणे आहेत आणि अशी अनेक गोष्टी असतात ज्या शु्ल्लक असतात किंवा ते खूप मोठ्या असतात, पण आपण त्याच्यावर बसून बोलणं गरजेचं आहे समजून घेणं गरजेचं आहे."

जग खूप बदलत चाललंय खूप प्रॅक्टिकल झालंय...

"दुसरं काय आहे हल्ली काय झालंय लग्नाच्या पद्धतीबद्दल आता काही लोकांना इतकी क्लॅरिटी आली ना की आम्हाला आम्हाला लग्नचं नाही करायचं. काय करायचंय लग्न करून? बंधनात नाही अडकायचं. तर हा त्यांचा निर्णय आहे. आता सगळं जग खूप बदलत चाललंय खूप प्रॅक्टिकल झालंय. याचं एक कारण की मला हे नको आहे. मी लिव्हइन मध्ये राहतोय मला लग्नाच्या बंधनामध्ये अडकल्यानंतर येणाऱ्या जे त्याच्या बरोबर येणाऱ्या 10 गोष्टी असतात त्या मला नको आहेत. का तर मला त्याच्यावर वेळचं नाही घालवायचा. एवढा मला नको आहे. ही सगळी जबाबदारी आणि तुझी फॅमिली माझी फॅमिली,  माझं फंक्शन तुझं फंक्शन. तो गोतावळा आणि ते अॅडिक्शन मला नको. हे समोर दिसतंय. माझं हे करिअर आहे, तू माझ्यासाठी आहेस मी तुझ्यासाठी आहे. आता ही क्लॅरिटी त्यांच्यामध्ये आली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यासाठी लिव्ह इनमध्ये राहण्यात काहीच हरकत नाही. " असं म्हणत लोकेश गुप्ते यांनी लिव्ह इन रिलेशनशिपवर मत व्यक्त केलं आहे. 

Web Title: marathi cinema actor lokesh gupte clear opinion on live in relationship says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.